नागपूरमध्ये गडकरींच्या मेहुणांच्या घरी चोरी, 22 लाखांचा ऐवज लंपास

महाराष्ट्राची क्राइम कॅपिटल बनलेल्या नागपुरात चोरांचा अक्षरशः धुमाकूळ सुरूय... केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे मेहुणे किशोर तोतडे यांच्या घरी आता चोरी झालीय. 

Updated: Apr 18, 2015, 10:21 PM IST
नागपूरमध्ये गडकरींच्या मेहुणांच्या घरी चोरी, 22 लाखांचा ऐवज लंपास title=

नागपूर: महाराष्ट्राची क्राइम कॅपिटल बनलेल्या नागपुरात चोरांचा अक्षरशः धुमाकूळ सुरूय... केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे मेहुणे किशोर तोतडे यांच्या घरी आता चोरी झालीय. 

नागपूरच्या पांडे लेआऊट भागात भरदिवसा हा प्रकार घडला. तोताडे काही कामासाठी अर्धा तास घराबाहेर गेले असताना, चोरांनी डल्ला मारला. घरातील 81 तोळे सोनं, 2 किलो चांदी आणि 1 हजार डॉलर्स असा सुमारे 22 लाख रूपयांचा ऐवज लुटून चोर पळून गेले. 

विशेष म्हणजे नागपूरचे नवे पोलीस आयुक्त एस. पी. यादव हे आयुक्तपदाचा पदभार स्वीकारत असतानाच चोरांनी त्यांना ही सलामी दिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.