चिपळूण । तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता
चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर दोघांचे मृतदेह सापडलेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता झाले आहे. दरम्यान, तिवरे धरणाची घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल झाले आहेत. दरम्यान, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 3, 2019, 08:40 AM IST