triple talaq verdict

हे आहेत जगातील सर्वात महागडे घटस्फोट

ट्रिपल तलाकवरुन गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. ट्रिपल तलाकवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाने दिला. यादरम्यान आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांबद्दलची माहिती देत आहोत.

Aug 22, 2017, 09:45 PM IST

#TripleTalaq, आझम खान यांची तिखट प्रतिक्रिया

ट्रिपल तलाकवर मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे जवळपास सर्व राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. पण असे काही नेते आहेत की त्यांना हे धार्मिक गोष्टीत कोर्टाची दखल असल्याचे वाटते आहे. 

Aug 22, 2017, 05:29 PM IST

तीन तलाकविरोधात तातडीने कायदा करु : मनेका गांधी

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तीन तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिला. कोर्टाने तीन तलाकचा चेंडू केंद्र सरकारकडे टोलवत सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा तयार होईपर्यंत तीन तलाकवर बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मुस्लीम महिला आनंद व्यक्त करत आहेत तर सरकारनेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Aug 22, 2017, 04:44 PM IST

ट्रिपल तलाक : कोर्टाच्या निर्णयावर कॉंग्रेसची प्रतिक्रीया काय?

घटनाबाह्य आणि मनमानी असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने इस्लाममधील 'ट्रिपल तलाक'वर ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसनेही कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रीया दिली आहे.

Aug 22, 2017, 04:24 PM IST

ऎतिहासिक ट्रिपल तलाक निर्णयाबाबत १० मुख्य गोष्टी

ट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टाने ऎतिहासिक निर्णय दिला असून मुस्लिम समाजातील या पद्धतीला कोर्टाने घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली असून ही बंदी यावर कायदा तयार होईपर्यंत असेल.  सुप्रीम कोर्टाच्या रूम नंबर १ मध्ये ट्रिपल तलाक प्रकरणावर कोर्टाने निर्णय देत ही पद्धत अमान्य, घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले.

Aug 22, 2017, 04:17 PM IST

तीन तलाकच्या निर्णयावर बोलले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या तीन तलाक प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. तीन तलाकवर आजपासून बंदी घालून, सरकारने सहा महिन्यात कायदा करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. या निर्णयानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Aug 22, 2017, 03:56 PM IST