राजकारण्यांना घाम फोडणारे, लाख मराठ्यांना एकत्र करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?
Maratha Aarakshan Who Is Manoj Jarange: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साधारपणे महिन्याभरापूर्वी उपोषण सोडणाऱ्या मनोज जरांगेनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आज जालन्यामधील आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या मोठ्या सभेचं आयोजन केलं आहे.
Oct 14, 2023, 08:52 AM ISTभर पावसात महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा
मराठा आरक्षणासाठी जालन्यात सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. दुसरीकडे जरांगे यांना राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतआहे.
Sep 8, 2023, 07:25 PM IST'आश्वासनातला एक शब्दही इकडे-तिकडे नको' उपोषण सोडण्याबाबत मनोज जरांगे सकाळी निर्णय घेणार
निजामकालीन महसुली नोंदी असलेल्यांना कुणबीचे दाखले देणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण जोपर्यंत जीआर काढत नाहीत तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Sep 6, 2023, 10:58 PM ISTMaratha Reservation: मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, वैद्यकीय टीमकडून तपासणी सुरु
Manoj Jarange Health Issue: आंदोलनकर्ते आणि मनोज जरांगे पाटील हे दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. उपोषणाच्या नवव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Sep 6, 2023, 08:30 AM ISTसरकारने जुनेच पाढे वाचले, जीआर आल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; जरांगे यांची स्पष्टोक्ती
Manoj jarange Reaction: सरकारचे शिष्टमंडळ मराठ्याच्या आरक्षणाचा जीआर घेऊनच येईल. आम्ही त्यांची देवासारखी वाट पाहतोय. आम्ही अधिकृत काही बोलणार नाही. सरकारच्या निरोपाची आम्ही वाट पाहत आहोत, असे जरांगे म्हणाले.
Sep 4, 2023, 04:16 PM ISTतहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?
Who Is Manoj Jarange: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्र स्थानी ही व्यक्ती आहे. अगदी शरद पवारांपासून संभाजीराजेंपर्यंत अनेकजण त्यांना भेटू आले आहेत.
Sep 4, 2023, 02:58 PM IST