अधिवेशनापूर्वी विरोधकांची काळी पत्रिका
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपूरात सुरुवात होत असून या अधिवेशनापूर्वी विरोधकांनी सरकारच्या श्वेतपत्रिकेला उत्तर देण्यासाठी काळी पत्रिका प्रसिद्ध केली आहे. तसंच विरोधकांनी सरकारच्या चहापानावरही बहिष्कार टाकला आहे. सिंचन घोटाळा हा या अधिवेशनात केंद्रस्थानी राहणार असून या घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधकांचे प्रमुख टार्गेट राहणार आहेत.
Dec 9, 2012, 08:35 PM ISTसेनाचा अविश्वास ठराव, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. नागपूर अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. दरम्यान, सरकराविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्धार शिवसेने केला आहे.
Dec 9, 2012, 03:13 PM ISTराज्यशासनाची हिवाळी अधिवेशनात कसोटी
राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. सिंचनाच्या पाण्यावरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित चव्हाण यांना टार्गेट करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. बाबा-दादा यांना धारेवर धरण्याची व्युहरचना केली आहे. त्यासाठी सिंचन घोटाळाचा प्रश्न उचलून धरण्यात येणार आहे.
Dec 9, 2012, 12:36 PM ISTलोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी
लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी मिळाली. त्यामुळे केंद्रातील युपीए सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपसह प्रमुख विरोधी पक्षांनी सुरूवातीपासून विरोध केला होता. यामध्ये भाजपने कडाडून विरोध करत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार ताशेरे ओढले होते.
Dec 5, 2012, 07:09 PM ISTएफडीआयमुळे बेरोजगार वाढेल - भाजप
एफडीआयच्या मुद्दावर संसदेच्या सभागृहात जोरदार विरोध करत भाजपने आक्षेप घेतला. मल्टिब्रँड रिटेलमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांची कोंडी होईल. त्यामुळे एफडीआय कोणाच्याही फायद्याचं नाही. रिटेल क्षेत्रात एकाधिकारशाही वाढेल, त्यामुळे एफडीआयचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केली
Dec 4, 2012, 08:22 PM ISTसंसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
संसदेचे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात गोंधळानेच झाली. वादग्रस्त `एफडीआय`च्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तर तृणमुल काँग्रेसने लोकसभाध्यक्षा मीरा कुमार यांच्याकडे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे.
Nov 22, 2012, 01:05 PM ISTहिवाळी अधिवेशन होणार चांगलेच गरम....
विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमांवर सत्ताधाऱ्यांनी बहिष्कार घालून संघर्षाचे संकेत दिले आहेत.
Dec 12, 2011, 05:16 AM ISTउधळू चला 'रूपये' उधळू चला....
दरवर्षाप्रमाणे या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनाला १२ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मात्र या अधिवेशनासाठी शासकीय निधीची प्रचंड उधळपट्टी होते आहे. मागील वर्षी नविन लावण्यात आलेल्या फ्लोअरींग टाईल्स गरज नसताना पुन्हा बदलल्या जात आहेत.
Dec 10, 2011, 06:51 AM ISTमुनगंटीवारांचे कापूसप्रश्नी सरकारवर टीकास्त्र
"कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव द्या, अन्यथा नागपुरातलं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही", असा इशारा भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
Nov 26, 2011, 09:10 AM IST