ओमी कलानींचं थेट कायद्यालाच आव्हान
भाजपमध्ये डेरेदाखल झालेले ओमी कलानी यांनी थेट कायद्यालाच आव्हान दिल्याची घटना समोर आली आहे. निवडणुकीमुळे ठाणे जिल्हयात आचारसंहिता लागू आहे. दरम्यान काल संध्याकाळी उल्हासनगरमधल्या गोल मैदानात भाजप आणि मित्र पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या भर सभेत ओमी कलानी कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून हातात भली मोठी नंगी तलवार घेऊनच दाखल झाले. यामुळे एकच खळबळ उडाली.
Jan 29, 2017, 11:14 AM IST