वरदाह चक्रीवादळ

वरदाह चक्रीवादळाचा फटका राज्यातील शेतीला, अचानक पावसाची हजेरी

वरदाह वादळं शमले असले त्याचा परिणाम आता महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. कोकण आणि मराठवाड्यात अचानक पावसाने हजेरी लावलीय. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर ओसरला असून रब्बीच्या पिकावर कीड आणि रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.

Dec 14, 2016, 09:40 PM IST

वरदाह चक्रीवादळ शमल्यानंतरचं चेन्नई

पूर्व किनारपट्टीवर आलेलं वरदाह चक्रीवादळ आता शमलं, असलं तरी तामिळनाडूमध्ये या वादळानं 18 जणांचे बळी घेतल्याचं आता स्पष्ट झालंय. राज्याच्या सहा जिल्ह्यांमध्ये किनारपट्टी भागाला वादळानं जबरदस्त तडाखा दिलाय. 

Dec 13, 2016, 10:51 PM IST