Paytm कर्मचार्‍यांसाठी खूषखबर ! 200 कर्मचारी झाले कोट्याधीश

ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप कंपनी पेटीएमच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ दिसून आली आहे. सध्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू 10 बिलियन अमेरिकन डॉलर झाली आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 30, 2018, 01:11 PM IST
Paytm कर्मचार्‍यांसाठी खूषखबर ! 200  कर्मचारी झाले कोट्याधीश  title=

मुंबई : ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप कंपनी पेटीएमच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ दिसून आली आहे. सध्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू 10 बिलियन अमेरिकन डॉलर झाली आहे. 
 
 पेटीएमच्या आजी-माजी सुमारे 200 कर्मचार्‍यांनी त्यांचे ESOP विकले आहेत. त्याची किंमत सुमारे 300 कोटी आहे. यानंतर कंपनीची मार्केट व्हॅल्यू वाढली आहे. यामुळे अनेक कर्मचारी कोट्याधीश झाले आहेत. 

ऑफिसबॉयने कमावले 20 लाख  

ज्यांनी पेटीएमचे शेअर विकून कमाई केली आहे त्यामध्ये पेटीएम कॅनडाचे चीफ एक्झिक्युटीव्ह हरिंदर ठक्कर यांचेही नाव आहे. त्यांनी 40 कोटी कमावले आहेत. तर एका ऑफिस बॉयने 20 लाख  कमावले आहेत. 

पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कर्मचार्‍यांना फायदा झाला आहे त्यामध्ये टेक्नोलॉजी, प्रोडक्ट, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, हयूमन रिसोर्स, सेल्स आणि फायनांस यांचा समावेश आहे.  

सॉफ्ट बॅंकेची इन्व्हेसमेंट  

जपानी बॅंक 'सॉफ्ट बॅंक'  यांनी देखील पेटीएममध्ये 1.4 बिलियन डॉलरची इन्व्हेसमेंट केली आहे. फ्लिपकार्टनंतर पेटीएमच्या व्हॅल्युमध्ये वाढ झाल्याने आता ती  दुसर्‍या क्रमाकांवर आली आहे. 
ESOP ही कंपनीच्या पगाराव्यतिरिक्त मिळणारी रक्कम आहे. 

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पेटीएमच्या वापरामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.