2022 Honda CB300F Vs CB300R: होंडाच्या या दोन बाइकमध्ये कोण वरचढ? जाणून घ्या

या दोन गाड्यांपैकी कोणती बाइक सरस? याबाबत बाइकप्रेमींमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे आज  दोन्ही बाईकची वैशिष्ट्य आणि किंमत सांगणार आहोत. 

Updated: Aug 16, 2022, 03:16 PM IST
2022 Honda CB300F Vs CB300R: होंडाच्या या दोन बाइकमध्ये कोण वरचढ? जाणून घ्या title=

2022 Honda CB300F & CB300R Comparison: होंडाची बाइक म्हंटलं की, मोटारसायकलप्रेमींसाठी जीव की प्राण असतो. त्यामुळे या गाड्यांबाबत कायमच उत्सुकता असते. होंडा कंपनीने नुकतीच ऑन-न्यू CB300F नेकेड स्ट्रीट-फायटर मोटरसायकल भारतात लाँच केली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 2.26 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. त्याचबरोबर होंडाकडे 300 सीसी सेगमेंटमध्ये CB300R निओ-रेट्रो मोटरसायकल देखील आहे. यामुळे या दोन गाड्यांपैकी कोणती बाइक सरस? याबाबत बाइकप्रेमींमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे आज  दोन्ही बाईकची वैशिष्ट्य आणि किंमत सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला बाइक निवडणं सोपं होईल. 

डिझाइन आणि रंग

होंडा CB300F ही एक नेकेड स्ट्रीट फायटर असून जबरदस्त लूक आहे. तर CB300R ही निओ-रेट्रो मोटरसायकल आहे आणि आकर्षक दिसते. दोन्ही मोटारसायकलमध्ये ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम, व्ही-आकाराचे अलॉय व्हील, स्प्लिट सीट सेट-अप आणि स्टबी एक्झॉस्ट आहे. सर्व-नवीन होंडा CB300F तीन रंगांमध्ये आहे. यात मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक आणि स्पोर्ट्स रेड या रंगांचा समावेश आहे. तर CB300R ही गाडी पर्ल स्पार्टन रेड आणि मॅट स्टील ब्लॅक शेड्समध्ये उपलब्ध आहे.

इंजिन आणि गिअरबॉक्स

होंडा CB300F मध्ये 293.52 सीसी, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, FI इंजिन आहे. हे इंजिन 24.1 बीएचपी आणि 25.6 एनएम टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे, होंडा CB300R मध्ये 286.01 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, FI इंजिन आहे. हे इंजिन 30 बीएचपी आणि 27.5 एनएम टॉर्क जनरेट करते. या दोन्ही बाइक 300 सीसी असून 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेल्या आहेत. या बाइकमध्ये असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील दिलं आहे. 

हार्डवेअर आणि वैशिष्ट्ये

दोन्ही बाइकमध्ये गोल्डन यूएसडी फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक एब्जॉर्बर दिले आहेत. ब्रेकिंगसाठी ड्युअल चॅनल एबीएससह डिस्क ब्रेक दिले आहेत. याशिवाय दोन्ही बाइक 17-इंच आकाराच्या ट्यूबलेस टायरसह येतात. दोन्ही मोटरसायकलमध्ये ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. त्याच वेळी, CB300F मध्ये थोडी अधिक वैशिष्ट्ये दिली असून ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि व्हॉइस कंट्रोल सिस्टम इ. दिलं आहे.

किंमत

नवीन लाँच झालेली 2022 Honda CB300F दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात Deluxe आणि Deluxe Pro यांचा समावेश आहे. या बाइकची बुकिंग सुरू झाली असून लवकरच डिलिव्हरी मिळेल. या बाइकची एक्स-शोरूम किंमत 2.26 लाख ते 2.29 लाख रुपये आहे. दुसरीकडे, होंडा CB300R फक्त एकाच प्रकारात उपलब्ध आहे. त्याची किंमत 2.77 लाख रुपये आहे.