तुमच्या गाडीचा मायलेज तुम्हाला कसा वाढवता येईल?

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलतांना दिसतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांत

Updated: Mar 29, 2021, 09:49 PM IST
तुमच्या गाडीचा मायलेज तुम्हाला कसा वाढवता येईल? title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलतांना दिसतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांत भारतात ही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ बघायला मिळाली. सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत होणारी वाढ  सर्वसामान्यांसाठी चिंताजनक बाब आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस इंधन वाचवण्यासाठी शक्य तो प्रयत्न करतांना दिसत आहे. इंधन वाचवण्यासाठी अधिक मायलेज असणाऱ्या गाड्या वापरण हा उत्तम पर्याय आहे.

तुम्हाला तुमच्या गाडीचा मायलेज वाढवायचा असल्यास काही बेसिक टीप्स तुम्हाला माहित असणं गरजेच आहे.

१. वाहनाची तपासणी आणि इंधन बदल
गाडी एक ठराविक अंतर चालल्यानंतर गाडीची तपासणी करणे आवश्यक असते. तसेच ठराविक कालवधी नंतर गाडीतील इंधन बदल  करणं गरजेच असते.

२. वेग मर्यादा
गाडी वेगाने चालवल्यास गाडीचा मायलेज वाढतो आणि इंधन बचत होते असा बऱ्याच वाहन चालकांचा गैरसमज असतो. पण वेगमर्यादेचे पालन करुन गाडी चालवणे महत्वाचे आहे. तसेच गाडी चालवतांना क्लचचा वापर कमीत कमी करावा.

३. गरजेनुसार वाहन सुरु ठेवणे
वाहतूक कोंडी किंवा कुणाची वाट बघत असतांना अनेकदा गरज नसतांना आपण वाहन सुरु ठेवतो. पण असे केल्यास गाडीचा मायलेज कमी होतो आणि तुमची गाडी अधिक इंधन पिते.

४. क्रुझ कंट्रोलचा वापर  
हल्ली अत्याधुनिक वाहनांत मोठ्या प्रमाणावर क्रुझ कंट्रोल सुविधेचा वापर होतांना दिसतो.   क्रुझ कंट्रोल सुविधेच्या मदतीने गाडीची वेगमर्यादा निश्चित करता येते. क्रुझ कंट्रोलमुळे गाडीला चांगला मायलेज मिळायला मदत होते.