Aadhaar Card Update Status :आधार कार्डधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी

आता इतक्या वर्षांनी आधार अपडेट करावे लागणार, प्रत्येक कार्डधारकांना असणार बंधनकारक 

Updated: Sep 17, 2022, 09:00 PM IST
Aadhaar Card Update Status :आधार कार्डधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी title=

मुंबई : देशातील प्रत्येक व्यक्तीकडे आज आधार कार्ड  (Aadhaar Card) असणे गरजेचे झालेय. तुमचं सरकारी अथवा खाजगी काम असो तुम्हाला आधार कार्ड शिवाय पर्याय नाही आहे. त्याशिवाय कोणतीच काम होत नाही. त्यामुळे असंख्य नागरिकांनी आता आधार कार्ड (Aadhaar Card) काढली आहेत.अशाच आधार कार्ड धारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 

केंद्रातील मोदी सरकार आधार कार्ड (Aadhaar Card) अपडेटबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने लोकांना दर 10 वर्षांनी त्यांचा बायोमेट्रिक डेटा स्वेच्छेने अपडेट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला आता 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे. 

'या' वयोगटाला बंधनकारक 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, UIDAI ला सध्या 5 आणि 15 वर्षांनंतरच्या मुलांना आधारसाठी त्यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक आहे.UIDAI नागरीकांना 10 वर्षांतून एकदा त्यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची शक्यता आहे. 

'या' वयोगटाला गरजेचे नाही
एकदा एखाद्या व्यक्तीने विशिष्ट वय ओलांडलं, म्हणजेच ७० वर्षे पुर्ण केलं असेल तर त्याला बायोमेट्रिक्स अपडेट करण्याची गरज भासणार नाही. दरम्यान हे निव्वळ एका वयोगटातील नागरीकांसाठी लागू असणार आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही आहे.  

दरम्यान सुत्रांनुसार वरील माहिती समोर आली आहे. UIDAI नागरीकांना 10 वर्षांतून एकदा त्यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करण्याच्या निर्णय़ावर विचार करत आहे. लवकरच या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.