आधार लिंक न केल्यास तुमच्या या सेवा अडचणीत

आधार लिंक करणे हे हसण्यावर घेऊ नका, नाहीतर काही सेवा घेताना तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 3, 2017, 10:33 PM IST
आधार लिंक न केल्यास तुमच्या या सेवा अडचणीत title=

मुंबई : आधार कार्ड लिंक करण्यावरून व्हॉटसअॅपवर जोक्स फिरवले जात आहेत, पण आधार लिंक करणे हे हसण्यावर घेऊ नका, नाहीतर काही सेवा घेताना तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.

मोबाईल कार्ड आधारला लिंक करा

सुप्रीम कोर्टाने  सध्या चालू असलेले सर्व मोबाईल क्रमांक,  रिव्हेरिफाय करण्याचे आदेश दिले आहेत.  आपला मोबाईल नंबर रिव्हेरिफाय करायची अंतिम मुदत ६ फेब्रुवारी आहे, असं न केल्यास, मोबाईल नंबर बंद पडू शकतो. तर नवीन सिम घेण्यासाठीही आधार कार्ड अनिवार्य आहे.

विमा पॉलीसीलाही आधार आवश्यक

बँक अकाऊंट, क्रेडिट कार्ड, विमा पॉलिसी, इक्विटी, म्युच्युअल फंड, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना, यासाठी ३१ डिसेंबर २०१७ ची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यानुसार यासर्व योजनांना आधार कार्ड जरूर लिंक करून घ्या.

तरच आयकर रिटर्न भरता येणार 

आधार पॅन कार्डशी लिंक न केल्यास तुम्हाला आयकर रिटर्न भरता येणार नाही. म्हणून आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ ही अखेरची तारीख आहे हे लक्षात असू द्या.आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे.

शासकीय अनुदान योजना

एलपीजी अनुदान, शिष्यवृत्ती योजना, पेंशन आणि शिधापत्रिका धारकांना आधारचा तपशिल देणं आवश्यक आहे. सरकारकडून ज्या योजनांसाठी अनुदान देण्यात येतं, त्यासाठीही तुम्हाला आधारची माहिती देणं अनिवार्य आहे. या योजनांच्या लाभार्थींसाठी ३१ डिसेंबर २०१७ ही डेडलाईन आहे. यापूर्वी ही तारीख ३० सप्टेंबर २०१७ होती.