Reason behind Google Adult Ads Notifications : आजच्या काळात स्मार्टफोन आणि इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. थोडक्यात काय तर स्मार्टफोन (smartphone) आणि इंटरनेट (Internet) मुलभूत गरज झाली आहे. अनेक वेळा गुगलवर आपल्याला अश्लील, आक्षेपार्ह जाहिराती पाहायला मिळतात. ज्या लैंगिक सामग्रीशी निगडीत असतात आणि तशा सूचनाही येतात. यामागचे कारण काय आहे आणि अशा प्रौढ जाहिराती का दिसतात हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घेण्यासाठी बातमी वाचा..
Google वर Adult Ads आहेत का?
Adult Ads या Google वर आधारित नाही तर तुमच्या नेहमीच्या सवयी आणि तुम्ही काय शोधतायत यावर Ads येत असतात. जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि गुगलवर ज्या प्रकारे एखादी गोष्ट वारंवारं सर्च करणार त्याचसंबधित जाहिरात तुम्हाला दिसणार.
Google वर Adult Ads कारणे
Google किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसणार्या जाहिराती तुमच्या शोध पद्धती, सवयी आणि सामग्रीवर आधारित असतात. हे या प्लॅटफॉर्मचे अल्गोरिदम आहे. जाहिराती केवळ वापरकर्त्यांच्या पसंती, त्यांचा वापर आणि त्यांच्या टिप्पण्यांच्या आधारावर दिसतात. याचा अर्थ असा की जर तुम्ही चुकून Adult संबंधात काही शोधत असाल किंवा चुकून त्या प्रकारच्या पृष्ठावर क्लिक केले तर Google ने ते लक्षात घेतले असते आणि त्याच जाहिराती दिसायला सुरुवात होते.
सूचना का येतात?
आता अशा Adult Ads च्या नोटिफिकेशन्स का येतात ते जाणून घेऊया. सहसा Google किंवा Chrome द्वारे सूचना येतात. त्यामागील कारण म्हणजे युजरचा सर्च पॅटर्न. बर्याच जाहिराती प्रौढांच्या वेबसाइटवरून देखील येतात कारण तुम्ही त्या वेबसाइट्सना जाणूनबुजून किंवा नकळत भेट दिली असेल. सेटिंग्जमध्ये जाऊनही या सूचना बंद केल्या जाऊ शकतात.