मोमो गेम : ब्लू व्हेलनंतर भयानक, आत्महत्येला प्रवृत्त करणारा हा व्हॉटस्अॅपनंबर

सोशल मीडिया आणि व्हॉटस्अॅपवरील एक गेम लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 3, 2018, 05:56 PM IST
मोमो गेम : ब्लू व्हेलनंतर भयानक, आत्महत्येला प्रवृत्त करणारा हा व्हॉटस्अॅपनंबर title=

मुंबई : सोशल मीडियावर एखादी गोष्ट ट्रेंड झाली तर सेलिब्रिटीसह जगात याची क्रेझ निर्माण होते. आता कीकी चॅलेंजने लोकांना वेड लावले आहे. चालत्या कारमधून उतरुन नाचण्याचे आव्हान स्विकारायचे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायचे. आता तर फेसबुक आणि व्हॉटस्अॅपवर नवीन गेम आलाय. हा नवीन खेळ लोकांमध्ये भय निर्माण करत आहे.

momo whatsapp Suicide game

तुम्ही सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत असाल तर सावधानता बाळगा. ब्लू व्हेल चॅलेंजप्रमाणे मोमो व्हॉटस्अॅपवर  गेम लोकांच्या जीवाशी खेळत आहे. मोमो व्हॉटस्अॅप  गेम लोकांच्या जीवनास धोका होत आहे. ब्लू व्हेल चॅलेंजच्या ओळीत बनलेल्या या आव्हानामुळे लॅटिन अमेरिकन देशांतील लोकांची झोप उडाली आहे. 

momo whatsapp Suicide Challenge

मोमो व्हॉटस्अॅप एक क्रमांक आहे. जो व्हॉटस्अॅपवर शेअर केला जात आहे. हा नंबर जोडल्यानंतर चित्रातील चेहरा धडकी भरवणारा दिसतो. हा नंबर जोडल्यानंतर, अशी अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांवर आत्महत्या करण्यासाठी हळूहळू उत्तेजित करतात.

Blue Whale Challenge

2016 मध्ये, ब्लू व्हेल गेमने संपूर्ण जगामध्ये दहशत पसरविली होती. ज्यामुळे त्याचा देशावर देखील परिणाम झाला. जगभरातील या खेळाच्या पार्श्वभूमीवर, अनेक मुलांमध्ये मृत्यू झाला.

dangerous momo whatsapp Suicide game came

मोमो गेमचा क्रमांक हा जपान एरिया कोडबद्दल सांगण्यात येत आहे. सर्वप्रथम फेसबुकवर पाहिले गेले, त्यानंतर अनेक लोकांनी दिलेल्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. बातम्यांनुसार, मोमो वॉटसॅपवर दिसणारी भितीदायक चेहरा एका जपानी संग्रहालयात ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे आहे.

momo whatsapp Suicide game came

तसचे, अनेक लोक असेही म्हणतात की, मोमो हे एक कट रचण्याचा प्रकार आहे. या मुख्य हेतू हा लोकांना घाबरवण्याच्या उद्देशाने व्हायरल केला आहे. दरम्यान, या नंबरचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, हा नंबर पाठवलाय, याचा शोध लागू शकलेला नाही.

after blue whale momo whatsapp Suicide game is in

सोशल मीडिया साइटवर संपर्क क्रमांक व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी समान प्रोफाइल बनविले आहे. लॅब एक्सपर्ट तज्ज्ञांनी मोमो नंबर वाचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा उलगडा होऊ शकलेला नाही. ही संकल्पना कोणी आणि कुठे पसरली जात आहे, हे अद्याप ठरविण्यात आले नाही. (फोटो आभार : @twitter)