Airtel ची धमाकेदार ऑफर, कमी किंमतीत रोज मिळणार डेटा आणि OTT बेनिफिट्स

ऑनलाइन कोर्स, गाणी ऐकण्यासाठी अॅप आणि बरेच बेनिफिस्ट, एअरटेलच्या या ऑफर्स तुम्हाला माहिती आहेत का?

Updated: Oct 24, 2021, 11:23 PM IST
Airtel ची धमाकेदार ऑफर, कमी किंमतीत रोज मिळणार डेटा आणि OTT बेनिफिट्स

मुंबई: एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. जिओ आणि वोडाफोनशी स्पर्धेत उतरत अधिक चांगली सेवा देण्यावर एअरटेल कंपनीचा भर आहे. कोरोनामुळे अनेकजण OTT प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. जर OTT प्लॅटफॉर्मसाठी वेगळे पैसे भरायचे असतील तर ते ज्यादा भरावे लागतील. त्याऐवजी काही 

कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवून रिचार्जसोबत OTT प्लॅटफॉर्म दर महिन्याला सबस्क्रीप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.तुम्ही जर OTT प्लॅटफॉर्मवर जास्त वेळ घालवत असाल तर तुमच्यासाठी हे रिचार्ज सर्वात बेस्ट आहेत. या रिचार्जसोबत तुम्हाला डेटा, 56 दिवसांची वैधता, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. याशिवाय एका OTT प्लॅटफॉर्मचं सब्स्क्रीप्शन देखील मिळणार आहे. कोणते तीन बेस्ट प्लॅन आहेत जाणून घेऊया. 

एअरटेलचे कोणते प्लॅन आहेत बेस्ट?

399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन: 56 दिवसांच्या वैधतेच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळणार आहेत. याशिवाय ग्राहकांना Apollo 24/7 सर्कल, मोफत HelloTunes, Airtel X-Stream Premium चे मोफत सबस्क्रिप्शन, Wink Music  आणि FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. 349 प्लॅनमध्ये अमेझॉन प्राईम देखील मिळतं मोबाईल रिचार्जसोबत. हे अमेझॉन प्राईम केवळ मोबाईलसाठी वापरता येऊ शकतं. 

449  रुपयांचा प्रीपेड प्लॅन: या प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांची वैधता मिळणार आहे. याशिवाय रोज 2 GB डेटाही मिळेल. 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना मोबाईल एन्टिव्हायरस, फ्री हेलोट्यून्स, एयरटेल एक्स-स्ट्रीम प्रिमियरचं सब्स्क्रिप्शन, विंक म्युझिक, FASTag वर 150 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. 

558  रुपयांचा प्रीपेड प्लॅन: 56 दिवसांची वैधता आणि 3 GB डेटा मिळणार आहे. 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.  मोबाइल एंटीवायरस, फ्री हेलोट्यून्स, एयरटेल एक्स-स्ट्रीम प्रीमियम,  शॉ अॅकेडमीचे फ्री कोर्स मिळणार आहेत. विंक म्युझिक आणि FASTag वर 150 रुपये कॅशबॅक मिळणार आहे