मुंबई : देशातली ज्या कंपनीची सध्या सर्वाधिक चर्चा आहे अशा रिलायंसच्या जिओ ४जी फोनला टक्कर देण्यासाठी आता एअरटेल या कंपनीने देखील आपला ४जी फोन लॉन्च करण्याचे ठरवले आहे. हा फोन येत्या दिवाळीपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत अंदाजे २५०० रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
इकॉनॉमी टाइम्सच्या बातमीनुसार एअरटेल कंपनीचा हा फोन ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस लॉन्च होण्याची शक्यता आहे. एअरटेलने मोबाईल उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे.
या ४जी फोनमध्ये एंड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीम असून गुगल प्ले स्टोअर मधून एप्स डाऊनलोड करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअॅपही डाऊनलोड करता येणार आहे. कारण जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता नाही येणार आहे. मोठी स्क्रीन, कॅमेरा, बॅटरी बॅकअप ही फोनची वैशिष्ट्य असणार आहेत. त्यामुळे जिओ फोनला हा फोन टक्कर देईल अशी चिन्ह आहेत. याबाबत एअरटेलने लावा आणि कार्बन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.