लग्न अरेन्ज करायचं... लव्ह करायचं... की करायचंच नाही...असं ठरवा

प्रत्येकाला आयुष्यात एका प्रश्नाला नक्कीच सामोरं जावं लागतं आणि तो म्हणजे तुमच्या ...

Updated: Oct 14, 2019, 10:34 PM IST
लग्न अरेन्ज करायचं... लव्ह करायचं... की करायचंच नाही...असं ठरवा

मुंबई : प्रत्येकाला आयुष्यात एका प्रश्नाला नक्कीच सामोरं जावं लागतं आणि तो म्हणजे तुमच्या आमच्या नातेवाईकांचा मित्रांचा तुम्हाला विचारण्यासाठी हक्काचा प्रश्न म्हणजे लग्न कधी करतोयस...पण लग्न तसा विषय सिरियसली घ्यायचा नाही आणि जास्त दिवस त्याकडे जोक म्हणूनही पाहायचं नाही असं म्हणतात.

पण आता स्टॅण्डअप कॉमेडी करणाऱ्यांनी लग्न करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर होणारी प्रश्नांची अतिवृष्टी आपल्या मजेदार शब्दात मांडली आहे, त्यावरून तुम्ही आता नक्की हे ठरवा, की लग्न अरेन्ज करायचं, लव्ह करायचं... की करायचंच नाही... लग्न ठरण्याआधी आणि लग्न ठरल्यानंतरचे साई़ड इफेक्टही यात मजेदार गंमत करत सांगितले आहेत.