जिओ युझर्सना मोठा धक्का, एवढे दिवस जे फ्री चाललं होतं.. ते आता...

रिलायन्स जिओ युझर्ससाठी 10 ऑक्टोबर 2019 पासून, इतर कंपन्यांच्या वापरकर्त्यांना आऊटगोईंग कॉल करणे फ्री असणार नाही.

Updated: Oct 10, 2019, 03:03 PM IST
जिओ युझर्सना मोठा धक्का, एवढे दिवस जे फ्री चाललं होतं.. ते आता... title=

मुंबई : रिलायन्स जिओ युझर्ससाठी 10 ऑक्टोबर 2019 पासून, इतर कंपन्यांच्या वापरकर्त्यांना आऊटगोईंग कॉल करणे फ्री असणार नाही. निश्चित जिओ सिम वापरणाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे. तुम्ही तुमच्या जिओ सिमकार्डवरून जिओशिवाय इतर कंपनीच्या युझर्सना कॉल केला, तर त्यासाठी तुम्हाला प्रतिमिनिट 6 पैसे आकारले जातील. 

जिओ उद्यापासून म्हणजे 10 ऑक्टोबरपासून हा शुल्क लागू करणार आहे. जिओने म्हटलं आहे, आता दुसऱ्या नेटवर्कच्या युझर्सना जिओवरून कॉल करायचा असेल तर प्रतिमिनिट 6 पैसे आकारले जातील.

विशेष म्हणजे जिओवरून जिओचे युझर्स फ्री बोलतील, लॅण्डलाईनलाही फ्री बोलता येणार आहे. पण यासोबत जिओने याची देखील घोषणा केली आहे की, याच किंमतीचा डेटा जिओ सिम वापरकर्त्याला फ्री दिला जाईल. पण 6 पैसे कॉलिंगने आकारलेले पैसे ही एका प्रकारे भरपाईच असणार आहे.

भरपाई म्हणण्याचं कारणंही तसंच आहे. कारण Reliance Jio ने कॉलिंगवर लावण्यात आलेल्या चार्जेसबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, कंपनीने इंटरकनेक्शन यूझेस चार्जसाठी 13 हजार 500 कोटी रूपये आपल्या स्पर्धक कंपन्याना मोजले आहेत, यात व्होडाफोन, आयडिया, भारती एअरटेलचा समावेश आहे.

टेलिकॉम इंडस्ट्रीत अनेक दिवसांपासूनInterconnect Usage Charge वर वाद सुरू आहे. रिलायन्स जिओला वाटतं की, TRAI इंटरकनेक्ट चार्जेस शून्य ठेवावेत. पण सध्या असं होत नाहीय, यासाठी जिओने हा मोठा निर्णय घेतला आहे.

जिओने असं देखील म्हटलं आहे, जोपर्यंत टर्मिनेशन चार्ज TRAI शून्य करत नाही. तोपर्यंत युझर्सना कॉलिंगसाठी पैसे द्यावे लागतील. हे चार्जेस सध्या तरी 1 जानेवारी 2020 पर्यंत लागू राहणार आहेत.

पोस्टपेड कस्टमर्सना देखील 6 पैसे प्रतिमिनिट द्यावे लागतील. पण कंपनीने पोस्टपेड कस्टमर्सकडूनही ही भरपाई करण्याचं ठरवलं आहे, यासाठी डेटा लिमिट वाढणार आहे. यासाठी 5 पैसे प्रति मिनिटासाठी महिन्याचा प्लान वाढणार आहे.