मुंबई : रिटेल स्टोअर्सपासून ते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तूंवर अमॅझोनने भरगच्च डिस्काऊंट देण्यासाठी दिवाळीपूर्वीच सेलची घोषणा केलीये. भारतात दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर सूट मिळावी म्हणून अॅमेझॉनने Great Indian Festival Sale ची घोषणा केली. लवकरच या सेलची तारीख देखील कळवण्यात येणार आहे.
सर्वत्र चर्चा सुरु असलेल्या Amazon Great Indian Festival Sale हा अॅमेझोन प्राईम मेंमरसाठी (Amazon Prime Members) आहे.
उर्वरित सदस्यांसाठी हा सेल लवकरच सुरु होईल. खरेदी करण्यासाठी या सेलमध्ये 60 नवीन प्रोडक्ट्स मिळणार आहेत. सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टवॉच, इअरबड्स, टीव्ही, डिव्हाईस आणि गेम्स त्यासोबतच पुस्तके आणि किचनच्या वस्तूंवर देखील सूट दिली जाणार आहे. कंपनीने या सवलतींची झलकही दिली आहे आणि बँकेच्या ऑफर्सबद्दलसुद्धा सांगितलं आहे.
Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान, ग्राहकांना खरेदीसाठी SBI क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या मदतीने 10 टक्के इंस्टंट सूट मिळू शकेल. Amazon ने अद्याप या सवलतीच्या वरच्या मर्यादेबद्दल माहिती दिलेली नाही.
अॅमेझोन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. टीझरनुसार, Samsung Galaxy M13 5G, iQoo 9T, Redmi Note 11 Pro 5G सारख्या स्मार्टफोन्सवर सेलमध्ये मोठी सूट दिली जाईल. सेलमधील बजेट फोन 5,999 रुपयांपासून सुरू होतील, तर मोबाइल अॅक्सेसरीज 49 रुपयांपासून सुरू होतील.
Amazon ने सांगितलं की, आगामी सेलमध्ये लॅपटॉपवर 40,000 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. यासोबतच स्मार्टवॉच आणि हेडफोनवर 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. टॅबलेटची सुरुवातीची किंमत 5,999 रुपये असेल. टीव्हीवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल आणि 4K टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. गेम्सवरही ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल.