मुंबई : लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात ६० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. जगभरातील आपल्या व्यवसायाचे रि-स्ट्रक्चर करण्यासाठी कंपनीने पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. यामुळे कंपनीने आपले कर्मचारी कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मीडिया रिपोटर्सनुसार, येत्या काळात कंपनी अजून काही कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु शकते.
अॅमेझॉनच्या दोन कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे की, २५% इम्पलाईला परफॉरमेंस इंप्रूवमेंट प्लॅनमध्ये (PIP) टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, येत्या काळात कंपनी अजून काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करु शकते. अॅमेझॉन इंडियाने कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या प्रक्रीयेला दुजोरा देत ही ग्लोबल प्रोसेस असल्याचे सांगितले.
कंपनीचे प्रवक्तांनी सांगितले की, ग्लोबल ऑर्गेनाईजेशन झाल्यामुळे आम्हालाही आमच्या टीम्स सुनियोजित करण्याची गरज भासली. यामुळे आम्ही आमच्या साधनांचा योग्य प्रकारे वापर करु शकू. कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे आणि आम्ही त्यांना पूर्ण मदत करत आहोत. त्यांना दुसरे काम देण्यात येत आहे. त्याचबरोबर भारतात ४००० पदांसाठी भरती सुरू आहे.
फेब्रुवारीत अॅमेझॉनने सिएटल हेड ऑफिसमधून काही कर्मचाऱ्यांना कमी केले. अॅमेझॉन भारतातील बिझनेससाठी नवीन प्लॅन तयार करत आहेत. या प्लॅन अंतर्गत कंपनी कर्मचाऱ्यांना कमी करुन नवीन काम देत आहेत.