जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून अभिनव उपक्रम राबवला जात आहे. एपीआय नाना कदम हे काही गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना नियोजनाचे धडे देत आहेत.
नैसर्गिक संकट आणि मालाला मिळत नसलेला भाव, यावर काय उपाय करता येईल यावर नाना कदम हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
पहिल्यांदाच खाकीतला एखादा अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना एवढ्या जवळून पाहत असताना दिसत आहे. नाना कदम यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि कृषी विज्ञान केंद्राचा कसा वापर करता येईल, परंपरागत शेतीशिवाय आधुनिक शेतीकडे, पिकांवरील आजारांकडे दुर्लक्ष करून कसं चालणार नाही.
आपल्या पिकांवर नेमका कोणता रोग पडला आहे, हे मोबाईलच्या सहाय्याने कसं त्याच ठिकाणी पाहता येईल. याविषयी ते मार्गदर्शन करीत आहेत. शेतीला नियोजनाची साथही आवश्यक असल्याचं ते म्हणतात.
तुमच्या पिकाचे तुम्हीच कसे डॉक्टर होवू शकतात, तसेच यामुळे शेतकऱ्यांचा होणार खत आणि किटकनाशकांवरील नको तो खर्च कसा वाचवता येईल, यावर नाना कदम हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल होताना दिसतोय.