फक्त 34 हजारांत खरेदी करु शकता iPhone 14; Apple कडून भन्नाट ऑफर

iPhone 14 Offer: तुम्ही जर iPhone 14 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Apple कडून एक भन्नाट ऑफर आहे. Apple अधिकृत स्टोअर युनिकॉर्नमध्ये (Unicorn Store) हा फोन तुम्ही फक्त 34 हजारात खरेदी करु शकता.   

Updated: Mar 22, 2023, 01:52 PM IST
फक्त 34 हजारांत खरेदी करु शकता iPhone 14; Apple कडून भन्नाट ऑफर

iPhone 14 Offer: जर तुम्ही iPhone 14 किंवा iPhone 14 Plus घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. कारण Apple अधिकृत स्टोअर युनिकॉर्नमध्ये (Unicorn Store) या फोनवर भन्नाट ऑफर दिली जात आहे. iPhone 14 आणि iPhone 14 Plus गतवर्षी सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आले होते. यामधील 128GB व्हेरियंटची किंमत 79 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. पण युनिकॉर्नमधून तुम्ही हा फोन खरेदी केल्यास बँक आणि एक्स्चेंज ऑफरच्या सहाय्याने कमी किंमतीत खरेदी करु शकता. 

तरुणीसह सध्या सर्वच वयोगटात iPhone ची क्रेझ आहे. जास्त पैसे खर्च करुन मोबाइल घेण्याचा विचार करत असाल तर iPhone हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे सध्या iPhone वर असलेली ऑफर पाहता गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर हा फोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. 

नेमकी डील काय आहे?

128GB व्हेरियंट iPhone 14 हा सध्या 79 हजार 900 रुपयांना उपलब्ध असून सर्व ऑफर एकत्रित करत तुम्ही 34 हजारात खरेदी करु शकतो. युनिकॉर्न स्टोअर या स्मार्टफोनवर 10 हजारांचा इन्स्टंट डिस्काऊंट देत आहे. यासह ही किंमत 69 हजारावर येत आहे. याशिवाय एचडीएफसीच्या बँक ऑफरवर तुम्हाला 4 हजारांचा डिस्काऊंट मिळत आहे. त्यात जर तुम्ही जुना फोन विकून त्याच्या जागी नवीन फोन घेत असाल तर 6 हजारांचा एक्स्चेंज डिस्काऊंट मिळेल. याशिवाय जुना फोन विकणाऱ्या ग्राहकांना 25 हजारांपर्यंत मिळतील. तुमचा आयफोन जितका नवा असेल तितका तुम्हाला जास्त मोबदला मिळेल. 

iPhone 14 मधील फिचर्स काय आहेत?

Apple iPhone 14 मध्ये बेझल्ससह 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED पॅनेल आहे. डिस्प्ले HDR ला सपोर्ट करणारा आहे. तसंच हा फोन 1200-nits च्या ब्राइटनेस आणि फेस आयडी सेन्सर्ससह येतो. याचा स्टँटडर्ड रिफ्रेश रेट 60Hz आहे. iPhone 14 ला पॉवरिंग A15 बायोनिक चिप आहे, ज्यामध्ये 16-कोर NPU आणि 5-कोर ग्राफिक्स प्रोसेसर आहे. प्रोसेसर 4GB पर्यंत RAM असून स्टोरेजसाठी 128GB, 256GB आणि 512GB असे तीन पर्याय आहेत. iPhone 14 नव्या iOS 16 आवृत्तीवर चालतो.

हा स्मार्टफोन 5G, Wi-Fi, dual SIM, Bluetooth, GPS ला कनेक्ट होता. कॅमेराबद्दल  बोलायचं गेल्यास iPhone 14 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरे आहेत. या मोठ्या f/1.5 अपर्चरसह प्रायमरी 12MP वाइड-एँगल सेन्सर, सेन्सर-शिफ्ट OIS आणि सेकंडरी 12MP अल्ट्रा-वाइड-एंगल शूटरचा समावेश आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी यात डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट आहे.