'अॅपल फेस्ट'वर स्वस्तात 'आयफोन'

आयफोन अनेकांना हवाहवासा फोन वाटतो, पण तेवढाच महागडा देखील, पण स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची तुम्हाला संधी चालून आली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 1, 2017, 08:30 PM IST
'अॅपल फेस्ट'वर स्वस्तात 'आयफोन' title=

मुंबई : आयफोन अनेकांना हवाहवासा फोन वाटतो, पण तेवढाच महागडा देखील, पण स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची तुम्हाला संधी चालून आली आहे. 

तुमच्या खिशाला परवडणारा आयफोन?

आता आयफोन फेस्टमध्ये तुम्हाला आयफोन एकदम स्वस्त मिळेलंच असं नाही, पण नेमका आयफोन किती स्वस्त मिळतोय, हे पाहण्यास काही पैसे लागत नसल्याने, तेवढा विचार करण्याची गरज नाही, विचार फक्त एकच खिशाला परवडणारा आयफोन तुम्हाला मिळतोय का?

अॅमेझॉनवर सध्या 'अॅपल फेस्ट'

इ-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर सध्या 'अॅपल फेस्ट' सुरू आहे, जिथे तुम्हाला 'आयफोन ७', 'आयफोन ६', 'आयफोन ६ प्लस'वर आकर्षक सवलत मिळणार आहे.

डिस्काउंट ऑफर्ससोबतच एक्सचेंज ऑफर

हा फेस्ट ९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात डिस्काउंट ऑफर्ससोबतच एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय, कॅशबॅक यांसारख्या ऑफरही आहेत. त्यामुळे आयफोन फोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.