अॅपलचा 30 सेकंदात ईसीजी दाखवणारा स्मार्टवॉच लाँच

काय आहेत फिचर्स 

अॅपलचा 30 सेकंदात ईसीजी दाखवणारा स्मार्टवॉच लाँच

मुंबई : अॅपलने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नवीन फीचर असलेले आयफोनचे स्मार्टवॉचची नवी सिरीज लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. अॅपल पार्क, कूपरटिनोच्या स्टीव जॉब्स थिएटरमध्ये बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्मार्टवॉचची सिरीज सादर केली. या स्मार्टवॉचची खासियत म्हणजे यामध्ये तुमचा ईसीजी देखील दिसणार आहे. याची विक्री 16 देशांत 14 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. याची किंमत 279 डॉलर ठेवण्यात आली होती. 

अॅपलने लाँच केला स्मार्टवॉच 

अॅपल वॉचच्या माध्यमातून आपण कुठेही अगदी 30 सेकंदात तुम्ही तुमचा ईसीजी तपासू  शकतो. तसेच कोणती एमर्जन्सीच्या वेळी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला मॅसेज पाठवू शकता. या अॅप्पल वॉचचे तीन वेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. फायर, वॉटर आणि वेपर फेस डिस्प्ले असं याची नावे आहेत. सीईओ कुकचा असा दावा आहे की, जगभरात 2 अरब आयओएस डिवाइस झाले आहेत. 

आयफोन स्मार्टवॉच घालणाऱ्या व्यक्तीची मोशन देखील डिटेक्ट केली जाईल. सीरीजच्या 3 च्या तुलनेत यामध्ये 35% मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच याचा परफॉर्मन्स देखील डबल करण्यात आला आहे. यामध्ये हार्ट रेटबरोबरच ईसीजी देखील दाखवला जाणार आहे. याच्या मदतीने कुठेही फक्त 3 सेकंदात तुमची ईसीजी कळू शकेल.