मुंबई : अॅपलचा आगामी आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन X हे फोन लाँच उद्या लॉन्च होत आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्स याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अॅपल आयफोन X लाँच करणार आहे. यामध्ये वायरलेस चार्चिंग फीचर, फेस डिटेक्शन, एज टू एज डिस्प्ले आणि पहिल्यांदाच होम बटण नसेल.
आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस या दोन्ही फोनसोबत हा फोन लाँच केला जाईल. कंपनीचा हा सर्वात महागडा फोन असण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत अमेरिकेत १००० डॉलर म्हणजे जवळपास ६३ हजार ७८५ रुपये (कर, सेस वगळून) असण्याची शक्यता आहे. आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन X हे तीन फोन अॅपलच्या कार्यक्रमात लाँच होणार आहेत.
आयफोन ८ मध्ये ४.७ इंच आकाराची, तर आयफोन ८ प्लसमध्ये ५.५ इंच आकाराची स्क्रीन असेल. या फोनला वायरलेस चार्जिंग आणि आयफोन ८ प्लस साठी ड्युअल रिअर कॅमेरा ही फीचर्स असण्याची शक्यता आहे.
या आयफोन इव्हेंटमध्ये आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन X या फोनसोबत एलटीई सपोर्टसह अॅपल वॉच ३ देखील लाँच होणार आहे.
आयफोन, मॅकबुक आणि वॉचेससाठी आयओएसची नवी अपडेट या इव्हेंटमध्ये रिलीज केली जाण्याची शक्यता आहे. या नव्या अपडेटमध्ये अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.