Tata ने फोडला आणखी एक 'बॉम्ब', 7 Seater SUV चे आपोआप लागतील ब्रेक...

Tata Motors Cars: टाटा मोटर्सने पुन्हा एकदा मोठी घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. टाटाने एक दिवस आधी हॅरियर एसयूव्हीच्या अपडेटेड व्हेरिएंटची बुकिंग सुरू केली होता. आता 7 सीटर एसयूव्ही Tata Safari च्या ADAS व्हेरिएंटचं देखील बुकिंग सुरू केली आहे.

Updated: Feb 17, 2023, 12:33 PM IST
Tata ने फोडला आणखी एक 'बॉम्ब', 7 Seater SUV चे आपोआप लागतील ब्रेक... title=

Tata Safari ADAS: कार प्रेमीसाठी मोठी बातमी आहे. टाटा मोटर्सने (Tata Motors) एक दिवस आधी आपल्या हॅरियर एसयूव्हीच्या अपडेटेड व्हेरिएंटची बुकिंग सुरू केली होती. आता कंपनीने आपली बहुप्रसिद्ध 7 सीटर एसयूव्ही Tata Safari च्या ADAS व्हर्जनची देखील बुकिंग सुरू केली आहे. विशेष म्हणजे कंपनीने Tata Safari च्या ADAS व्हर्जनमध्ये अद्ययावत फीचर्स दिले आहेत. गाडीत ADAS (एडवान्स ड्रायव्हर असिस्टेंट सिस्टम) देण्यात आली आहे. Tata Safariची सध्या भारतीय बाजारात बोलबाला आहे. टाटा मोटर्सने अपडेटेड सफारी एसयूव्हीची बुकिंग सुरू केली आहे.

7 Seater SUV मध्ये मिळणार 'हे' अत्याधुनिक फीचर्स...

Tata Safari मध्ये ADAS सिस्टम मिळणार आहे. याचा अर्थ असा, की यात फॉरवर्ड कोलिशन वार्निंग, ऑटो इमरजेन्सी ब्रेकिंग, ट्रॅफिक साइन रिकग्निशन, लेन डिपार्चर वार्निंग, लेन चेंज अलर्ट, हाय बीम असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, रिअर क्रॉस सारख्या फीचर्सचा समावेश असणार आहे. या शिवाय या गाडीत ट्रॅफिक अलर्ट, रिअर धडक इशारा, डोअर ओपन अलर्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्रामची सुविधा देखील मिळणार आहे.

विशेष म्हणजे  Tata Safari मध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम बसवण्यात आली आहे. याची साइज 10 इंच असेल. एंड्रॉइड ऑटो, ऐप्पल कारप्लेला ही सिस्टम सपोर्ट करेल. सोबत 9 जेबीएल स्पीकर सिस्टम देखील देण्यात आली आहे. सोबत 360 डिग्री पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्याच्या मदतीने एसयूव्ही पार्क करू शकतात. टाटा मोटर्सने इंस्ट्रूमेंट क्लस्टर देखील अपडेट केलं आहे.

इंजिन आणि पॉवरमध्ये देखील बदल...

Tata Motors ने आपल्या Tata Safari  7 Seater SUV च्या इंजिनमध्ये देखील महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नवीन उत्सर्जन मानदंड पूर्ण करण्यासाठी गाडी डिझाइन केली आहे. 2.0-लिटर क्षमता असलेलं डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. ते 168 बीएचपी आणि 350 एनएम जेनरेट करते. यात 6-स्पीड मॅनुअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल. 

एक्सटीरिअरमध्ये Tata Safari  7 Seater SUV ला एक नवे रेड डार्क एडिशन देण्यात आलं आहे. ऑटो एक्सपो 2023 मध्ये पहिल्यादा ही गाडी शोकेस करण्यात आली होती. नव्या व्हेरिएंटच्या किमतीत जवळपास 50 हजार ते से 1 लाख रुपये वाढण्याची शक्यता आहे. सध्या सफारी Tata Safari ची किंमत 15.65 लाख ते 24.01 लाख रुपयेदरम्या आहे.