Sundar Pichai यांचे नवे आदेश, 'कर्मचाऱ्यांनो.. 2 ते 4 तास Bard सोबत घालवा'

Google Bard, Sundar Pichai : बार्ड (Google Bard) या सेवेची चाचणी गुगलने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. ही सेवा चॅटजीपीटीपेक्षाही हायटेक असेल, असा विश्वास तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 

Updated: Feb 17, 2023, 11:48 AM IST
Sundar Pichai यांचे नवे आदेश, 'कर्मचाऱ्यांनो.. 2 ते 4 तास Bard सोबत घालवा' title=
Google Bard, Sundar Pichai

Google Bard vs ChatGPT: गुगल या सर्वात मोठ्या सर्च इंजिनला (Google) टक्कर देणं कोणालाही जमलं नाही. बड्या कंपन्यांमध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारित चॅटजीपीटीने (Chat GPT) विविध क्षेत्रात पाय रोवला आहे. अशातच आता गुगलनं आपली स्वत:ची एआय (Artificial Intelligence) आधारीत चॅटबॉट सेवा बार्ड (Bard) ही यंत्रणा विकसित केली आहे. त्यासाठी आता गुगल मोठे निर्णय घेत असल्याचं पहायला मिळतंय. (CEO Sundar Pichai asks staff to spend 2-4 hrs a day testing chatbot Google Bard vs ChatGPT battle intensifies Know details)

पिचाई यांनी यासंदर्भात कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला आहे. पिचाई म्हणतात, कर्मचार्‍यांनी AI-चालित चॅटबॉट्स वापरून पहावं कारण ChatGPT लोकप्रियता आणि व्यवसायात वाढत आहे. गुगलने एआय चॅटबॉट बार्ड लाँच केल्यानंतर आठवड्याभरानंतर सादरीकरण करताना चुकीचं उत्तर दिलं होतं. या डेमोनंतर गुगलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. त्यानंतर आता त्यावर आधिक काम करण्याची गरज आहे, असं पिचाई यांना वाटतंय.

पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना बार्डचे तंत्र परिपूर्ण करण्यासाठी दोन ते चार तास घालवण्यास सांगितले आहे. कंपनी पुढील आठवड्यात या संदर्भात सविस्तर योजना पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तंत्रज्ञान अपेक्षेपेक्षा अधिक क्षमतेसह वेगाने विकसित होत असल्याचं पिचाई यांनी सांगितलंय. आमची काही सर्वात यशस्वी उत्पादनं बाजारात आलेली पहिली नव्हती, असं पिचाई यांनी म्हटलंय.

ChatGPT म्हणजे काय?

ChatGPT म्हणजे जनरेटिव्ह प्री ट्रेनेड ट्रान्सफॉर्मर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च कंपनी OpenAI ने AI आधारित चॅटबॉट Chat GPT सादर केलाय. चॅट GPT ला ट्रेन करण्‍यासाठी, विकसकांनी सार्वजनिकपणे उपलब्‍ध डेटा गोळा केला आहे आणि तो फीड केलाय. ChatGPT लाँच झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत युजर्सची संख्या शुन्यावरून 100 मिलियनवर पोहोचली आहे.

आणखी वाचा - मायक्रोसॉफ्टच्या Chat GPT ला टक्कर देणार Google चा एआय टूल Bard, कोण ठरणार वरचढ?

बार्ड (Google Bard) म्हणजे काय?

बार्ड (Google Bard) म्हणजे एक आदिवासी कवी, गायक, नायक आणि त्यांच्या कृतींवर श्लोक तयार करण्यात आणि पाठ करण्यात कुशल होते. वापरकर्त्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी गुगलने आपला एआय चॅटबॉटही विकसित केला असून त्याला बार्ड असं नाव देण्यात आलंय.