Bajaj Qute: बजाजनं आणली बाइकपेक्षा स्वस्त कार! मायलेज आणि किंमत वाचाल तर बसेल आश्चर्याचा धक्का

Bajaj Qute: स्वस्त मस्त गाड्यांच्या ताफ्यात आणखी एका गाडीची भर पडली आहे. या गाडीची किंमत दुचाकीपेक्षा कमी आहे असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. स्पोर्ट्स बाइकच्या तुलनेत या गाडीची किंमत कमीच आहे. दुचाकी निर्मात्या बजाज कंपनीने काही दिवसांपूर्वी बजाज Qute ही गाडी लाँच केली होती. मात्र आतापर्यंत ही गाडी कमर्शियल यूजसाठी वापरली जात होती. मात्र लवकरच सामान्य नागरिकही ही गाडी खरेदी करू शकतात.

Updated: Jan 24, 2023, 03:20 PM IST
Bajaj Qute: बजाजनं आणली बाइकपेक्षा स्वस्त कार! मायलेज आणि किंमत वाचाल तर बसेल आश्चर्याचा धक्का title=

Bajaj Qute: तुम्हाला देशातील स्वस्त कारबाबत विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा टाटा नॅनोचं चित्र उभं राहील. सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून टाटा कंपनीने या गाडीचं लाँचिंग केलं होतं. दुसरीकडे मारुतिच्या ऑल्टोकडेही याच अपेक्षेनं पाहीलं जातं. कारण स्वस्तात मस्त कार म्हणून मारुति ऑल्टोला अनेक जण पसंती देतात. आता स्वस्त मस्त गाड्यांच्या ताफ्यात आणखी एका गाडीची भर पडली आहे. या गाडीची किंमत दुचाकीपेक्षा कमी आहे असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. स्पोर्ट्स बाइकच्या तुलनेत या गाडीची किंमत कमीच आहे. दुचाकी निर्मात्या बजाज कंपनीने काही दिवसांपूर्वी बजाज Qute ही गाडी लाँच केली होती. मात्र आतापर्यंत ही गाडी कमर्शियल यूजसाठी वापरली जात होती. मात्र लवकरच सामान्य नागरिकही ही गाडी खरेदी करू शकतात. बजाजची ही क्यूट एक क्वॉड्रीसायकल सेगमेंटमध्ये येते. हा सेगमेंट थ्री-व्हिलर आणि फोर व्हिलरच्या मधली जागा भरून काढतो. 

क्वॉड्रीसायकल सेगमेंटमध्ये नोंदणीच्या हेतूने या गाडीचं लाँचिंग लांबलं होतं. त्यानंतर 2018 मध्ये या गाडीचं लाँचिंग झालं. कंपनीने ही गाडी ऑटो रिक्षाला पर्याय म्हणून आणली होती. या गाडीची किंमत 2.48 लाख रुपये इतकी आहे. ऑटो रिक्षाप्रमाणे या गाडीत 3 लोकांना बसण्याची सुविधा आहे. पण ही गाडी सध्या कमर्शियल वापरासाठी उपलब्ध आहे. मात्र लवकरच खासगी वापरासाठी ही गाडी वापरता येईल. बजाजला प्रायव्हेट/नॉन ट्रान्सपोर्ट कॅटगरीमध्ये Qute साठी अप्रुव्हल मिळालं आहे. या गाडीत ड्रायव्हरसह चार व्यक्तींना बसण्याची व्यवस्था आहे.

बातमी वाचा- लय भारी! पोर्शे Cayman GT4 RS गाडीचं 25 जानेवारीला सादरीकरण, मुंबईकरांना मिळणार खास संधी

या गाडीची टॉप स्पीड 70 किमी प्रतितास इतका आहे. या गाडीचं इंजिनची क्षमता 10.8 एचपीवरून 12.8 एचपी झाली आहे. या गाडीत पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही वर्जन आहेत. तसेच नव्या गाडीचं वजन देखील 17 किलोनं वाढलं आहे. स्टँडर्ड विंडो आणि एसीमुळे हे वजन वाढलं असण्याची शक्यता आहे. बजाज क्यूट 4डब्ल्यूमध्ये 216 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 10.8 एचपी आणि 16.1 बीएचपी पॉवर जनरेट करते.