Bikes Sales: देशात सर्वाधिक विकलेली गेलेली बाईक केवळ 5 हजारांत घरी न्या! जाणून घ्या ऑफर

Top 10 bikes: टॉप 10 बाईक्समध्ये हीरो, होंडा, टीव्हीएस, बजाज आणि रॉयल एनफील्ड या कंपन्याच्या प्रत्येकी दोन बाईकचा समावेश आहे. हीरो स्पेलेंडर पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विकली गेलेली बाईक ठरली आहे. हीरो मोटोकॉपची एका दमदार बाईकने विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानापर्यंत सुसाट धाव घेतली आहे.

Updated: Jan 23, 2023, 10:49 PM IST
Bikes Sales: देशात सर्वाधिक विकलेली गेलेली बाईक केवळ 5 हजारांत घरी न्या! जाणून घ्या ऑफर title=
Second Best selling motorcycles in India

Best selling motorcycles in India: डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या बाईक विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. टॉप 10 विकल्या गेलेल्या बाईक्समध्ये हीरो (Hero), होंडा (Honda), टीव्हीएस (TVS), बजाज (Bajaj) आणि रॉयल एनफील्ड (Royal Enfield) या कंपन्यांच्या बाईकचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रत्येक कंपनीच्या दोन बाईक या यादीत आहेत. हीरो स्प्लेंडर पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विक्री झालेली बाईक आहे. डिसेंबर 2022 मध्ये 2 लाख 25 हजार 443 हीरो स्प्लेंडर विकल्या गेल्या आहेत. डिसेंबर 2021 च्या तुलनेत हीरो स्प्लेंडरच्या विक्रीमध्ये 0.58 टक्के घसरण झाली आहे. दुसरीकडे हीरो मोटकॉपच्या एका बाईकने दमदार कामगिरी करत सर्वाधिक विकल्या गेलेल्या गाड्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी उडी मारली आहे.

कोणती आहे ही बाईक?

सर्वाधिक विकल्या गेलेल्या बाईक्सच्या यादीमधील दुसऱ्या स्थानी झेप घेणारी ही बाईक आहे हीरो एचएफ डीलक्स (Hero HF Deluxe). डिसेंबर 2022 मध्ये या बाईकचे एक लाख 7 हजार 755 यूनिट्स विकले गेले आहेत. विशेष म्हणजे 2021 च्या तुलनेत या बाईकच्या विक्रीमध्ये तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये या बाईकचे केवळ 24 हजार 675 युनिट्स विकले गेले. हीरो एचएफ डीलक्सच्या विक्रीने होंडाच्या अॅक्टिव्हालाही मागे टाकलं आहे. सध्या अॅक्टिव्हा सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

किंमत किती आणि ऑफर काय?

हीरो एचएफ डीलक्स बाईकच्या बेस व्हेरिएंटची किंमत 60 हजारांच्या आसपास आहे. ही किंमत किक स्टार्ट ड्रम अलॉय विल व्हेरिएंटची (Kick Start Drum Alloy Wheel) आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हे व्हेरिएंट ईएमआयवर विकत घेऊ शकता. केवल पाच हजार रुपयांच्या डाऊन पेमेंटवर ही बाईक विकत घेता येणार आहे. बँकेतील व्याजदर हे 9.30 टक्के इतके असून. कर्जाचा कालावधी तीन वर्षांपर्यंत ठेवता येईल. म्हणजेच दर महिन्याला केवळ 2 हजार 120 रुपयांचा हफ्ता भरावा लागेल.

विशेष तंत्रज्ञान

हीरो एचएफ डीलक्स या बाईकमध्ये 97.2 सीसीचं फोर- स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. ही एक किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये आयथ्रीएस तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. या माध्यमातून इंधनाची 9 टक्क्यांपर्यंत बचत होते.