नवी दिल्ली : दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोकडून (Bajaj Auto) पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (E-Scooter) १६ ऑक्टोबर रोजी लॉन्च करण्यात येण्याची शक्यता आहे. कंपनीकडून या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरचं नाव ई-चेतक ठेवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. नवीन स्कूटर बजाजच्या नव्या सब ब्रँड अर्बेनाइटचा भाग आहे.
सणा-सुदीच्या काळात लॉन्च करण्यात येणाऱ्या या स्कूटरचा सेल नवीन वर्षाच्या सुरुवातील म्हणजेच २०२०मध्ये सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे.
पुण्यातील रस्त्यांवर चाचणीदरम्यान या स्कूटरला गुप्त कॅमेराद्वारे कैद करण्यात आले होते. स्कूटरला नियो-रेट्रो डिझाइन असण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलइडी लाइट, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स फिचर्स असण्याची शक्यता आहे.
एका ऑटो वेबसाइटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार, स्कूटरची किंमत जवळपास एक लाख रुपये असण्याची शक्यता आहे. परंतु बजाजकडून ही स्कूटर कमीत कमी किंमतीत लॉन्च करण्याचा प्रयत्न आहे.
बजाजकडून स्कूटरचा अधिकृत फोटो जाहीर करण्यात आला नाही. मात्र स्कूटरच्या टेस्ट ड्राइव्हदरम्यान याचा लूक समोर आला आहे.
First #electric #motorcycle from @Bajajauto Look into the upcoming Bajaj Urbanite the new electric bike under going road testing! #EV Truly looking forward to this one for a zero emission vehicle. Sleek, sporting nice lights, smooth running! #ebike #ElectricVehicles #motorbike pic.twitter.com/hZUm2YPbfx
— Ajith Mathew George (@AjithMG) May 23, 2019
एका ट्विटर यूजरने, नव्या स्कूटरचा व्हिडिओ शेयर केला आहे. यात स्कूटरची टेस्ट ड्राइव्ह दिसत आहे. कंपनीने त्यांच्या लोकप्रिय ब्रँड चेतकच्या थीमप्रमाणे, जवळपास मिळती-जुळती या स्कूटरची डिझाइन आहे. या स्कूटरच्या स्पेसिफिकेशनबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रिपोर्टनुसार, ही स्कूटर १२ इंची एलॉय व्हील्सवर धावणार असून चेतकलाही अशाच प्रकारची डिझाइन देण्यात आली होती.