close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'Motorola'चा नवा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार?

काय आहेत Motorola One Macro चे फिचर्स

Updated: Oct 11, 2019, 05:22 PM IST
'Motorola'चा नवा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार?

नवी दिल्ली : मोटोरोला (Motorola) आज भारतात नवा स्मार्टफोन  Motorola One Macro लॉन्च करण्याची शक्यता आहे. मोटोरोलाने आपल्या नव्या स्मार्टफोनला ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर टीज केलं आहे. त्याशिवाय कंपनीकडून स्मार्टफोनला वेबसाइटवरही लिस्ट करण्यात आलं आहे. 

फ्लिपकार्टवर Motorola One Macro फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. मात्र Motorola One Macro ची विक्री कधीपासून सुरु होणार याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

या फोनला देण्यात आलेला मायक्रो कॅमेरा सेन्सर फोनचे खास वैशिष्ट्य ठरत आहे.

काय आहेत Motorola One Macro ची वैशिष्ट्ये - 

- ओक्टा कोर प्रोसेसर (octa-core processor)
- ६. २ इंची डिस्प्ले
- ६४ जीबी स्टोरेज
- ४ जीबी रॅम
- ८ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा
- १२ + २ + २ मेगापिक्सल रियल कॅमेरा
- ४००० mAh बॅटरी
- Android 9 Pie OS