प्रतिक्षा संपली...Battlegrounds Mobile India गेम भारतात लाँच

Battlegrounds Mobile India अखेर भारतात ऑफिशियली लाँच करण्यात आला आहे.

Updated: Jul 2, 2021, 11:23 AM IST
प्रतिक्षा संपली...Battlegrounds Mobile India गेम भारतात लाँच title=

मुंबई : Battlegrounds Mobile India फॅन्ससाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. Battlegrounds Mobile India अखेर भारतात ऑफिशियली लाँच करण्यात आला आहे. गेम पब्लिशरने याबाबत आज घोषणा केली आहे. यामुळे आता पबजी मोबाईलचा भारतीय अवतार गुगल प्ले स्टोअरवर प्रत्येकासाठी उपलब्ध आहे.

Battlegrounds Mobile India ला अधिकृतरित्या 2 जुलैला सकाळी 6.30 वाजता लाँच करण्यात आलं. सध्यातरी या गेमला केवळ एँड्रॉईड व्हर्जनसाठी डाऊनलोड करण्यात आलं आहे. याला डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Battlegrounds Mobile India सर्च करावं लागणार आहे. 

सर्च रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला Battlegrounds Mobile India ला तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्या. जर तुम्ही या गेमचं अगोदरचं व्हर्जन इन्स्टॉल केलं असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन गेमला अपडेट करावं लागेल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचं बीटा व्हर्जन देखील डाऊनलोड करू शकता.

मुख्य म्हणजे याला डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या इंटरनेटची कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे, इंडियाचं बॅटलग्राऊंड गिफ्टला 1 मिलियन आणि 5 मिलियन डाऊनलोड रिवॉर्ड 19 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलंय.

यापूर्वी गेमला बीट टेस्टरसाठी गेल्या महिन्यात उपलब्ध केलं होतं. यानंतर अर्ली व्हर्जनला सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आलं होतं. तर आता याला ऑफिशियली भारतात लाँच करण्यात आलं आहे. आतापर्यंत या गेमला 1 मिलियनपेक्षा जास्त युजर्सने डाऊनलोड केलं आहे.