Mobile Banking : तुमचंही PNB, SBI, Canara बँकेत खातं आहे का? हातातली कामं सोडून पाहा ही बातमी

धक्कादायक माहिती समोर आल्यामुळं तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. 

Updated: Sep 29, 2022, 09:07 AM IST
Mobile Banking : तुमचंही PNB, SBI, Canara बँकेत खातं आहे का? हातातली कामं सोडून पाहा ही बातमी  title=
Be alert while doing mobile banking transactions details inside

Net Banking : डिजिटलायझेशनच्या या दिवसांमध्ये सध्याच्या काळात असंख्य आव्हानं उभी राहताना दिसत आहेत. फसवेगिरी वाढल्यामुळं आता बँकेतही पैसे सुरक्षित नाहीत, अशीच भावना सर्वसामान्य खातेदारांच्या मनात घर करु लागली आहे. ही भीती असतानाच पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. मोबाईल बँकिंग सिस्टीमला व्हायरसचा मोठा धोका निर्माण झाल्याचं यातून कळत आहे. (Be alert while doing mobile banking transactions details inside)

सदरील प्रकरणी (SBI) एसबीआय, पीएनबी (PNB)आणि कॅनरा (Canara) बँकेने यासंदर्भातील अलर्ट जारी केला आहे. आपल्या मोबाईलमधील व्हॅल्युएबल अॅक्सेस चोरी होऊ देऊ नका, ट्रस्टेड अॅप्स (Apps) अधिकृत अॅप स्टोअरवरूनच (App Store) डाऊनलोड (Dowload) करा असा इशारा या तीन बँकांना दिला आहे. 

अधिक वाचा : Google वर फुकटमध्ये पाहा नवीन चित्रपट, कसं ते जाणून घ्या

 

सोव्हा मालवेअरमुळे तुमचं खातं क्षणात रिकामं होऊ शकतं असं म्हणत हॅकिंग व्हायरसचं नवं व्हर्जन भारताच्या ब्लॅक मार्केटमध्ये पोहोचलं आहे हेच यातून स्पष्ट करण्यात आलं. 

मोबाईल बँकिंग सिस्टीमला सोव्हा (Android) अँड्रॉईड ट्रोजन व्हायरसचा धोका आहे. या नव्या व्हायरसमुळे कोणत्याही मोबाईल बँकिंग सिस्टीमचा युझरनेम (Username) आणि पासवर्ड हॅक करता येऊ शकतो. तो एकदा मोबाईलवर इन्स्टॉल  (Install) झाला की तो डिलीटही करता येत नाही.

Sova Virus नं यापूर्वी रशिया, स्पेन आणि अमेरिका या देशांनाही निशाण्यावर घेतलं होतं. हे मालवेअर तेव्हाच क्रेडेन्शियल कॅप्चर करते जेव्हा युजर्स त्यांच्या नेट बँकिंग अॅपमध्ये व्यवहार करण्यासाठी लॉगईन करतात.