पैसे पाठवण्यासाठी UPI वापरताना काळजी घ्या, नाहीतर फसवणूक होऊ शकते!

आपण नेहमी जवळच्या बँक फसवणुकीच्या बाबतीत ऐकत असतो. मात्र यूनीफाई पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे पैसे देवाण-घेवाण नंतर आता UPI फसवणुकीत सुद्धा वाढ झाली आहे.

Updated: Apr 24, 2019, 07:05 PM IST
पैसे पाठवण्यासाठी UPI वापरताना काळजी घ्या, नाहीतर फसवणूक होऊ शकते! title=

मुंबई : आपण नेहमी जवळच्या बँक फसवणुकीच्या बाबतीत ऐकत असतो. मात्र यूनीफाई पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे पैसे देवाण-घेवाण नंतर आता UPI फसवणुकीत सुद्धा वाढ झाली आहे. देशात डिजिटल फसवणुकीच्या तपासणीसाठी मर्यादीत पायाभूत सुविधांमुळे सावधगिरी बाळगणे चांगले आहे. नॅशनल पेंशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)च्या मते, UPI ही एक अशी प्रणाली आहे, जी एकाधिक बँक खात्यांना एका मोबाईल अ‌ॅप्लिकेशनला जोडते, आणि व्यापारी देयक सुलभ करते.

UPI कसं काम करतो
यूपीआय वापरण्यासाठी, ग्राहकाने अशा प्रकारच्या व्यवहारास मोबाइलअॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. वापरकर्ते कोणत्याही खासगी विकासक किंवा त्यांच्या बँकेच्या अॅपचा वापर करू शकतात. वापरकर्त्यांना व्हर्च्युअल आयडी किंवा पेमेंट पत्ता आणि पासवर्ड तयार करावा लागतो. यानंतर, आपल्याला या बँकेसह आपले बँक खाते जोडावे लागते. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यास यूपीआय वैयक्तिक ओळख क्रमांक तयार करावा लागतो. हे सर्व केल्यानंतर यूपीआय अॅपद्वारे पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

UPI पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी एनपीसीएलने सर्व शक्य ते उपाय केले आहेत, परंतु त्याखेरीज एनपीसीएल यूपीएच्या कोणत्याही फसवणुकीसाठी जबाबदार नाही. म्हणून UPI वापरताना तुम्हाला जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

कशाप्रकारे UPI द्वारे फसवणूक होऊ शकते 
UPIच्या फसवणुकीचे दोन मार्ग असू शकतात. प्रथम, वापरकर्ता चुकून त्याची माहिती दुसऱ्या व्यक्तीला सांगतो. किंवा अॅपमध्ये एक बग किंवा सापळा असतो, जो चोरी करून आणि प्रसारीत करून आवश्यक असलेली माहिती चोरतो. दोन्ही प्रकरणांमध्ये फसवणुकीची प्रकरणे वाढत आहेत.

UPI फसवणूकीपासून कसे वाचावे
1. आपल्या बँक अंकाउट, UPI पिन, OTP(One Time Password)ची माहिती कोणाला देऊ नये. बँक या बाबतीत परत परत आपल्या ग्राहकांना सूचना देत असते. कोणतीही बँक आपल्याला आपल्या अकाऊंटबद्दल माहिती विचारत नाही. 

2. चांगला अॅन्टीव्हायरस वापरा.

3. चुकीचे अ‌ॅप डाऊनलोड करणे टाळा. कोणतेही अ‌ॅप डाउनलोड करण्याआधी त्या अ‌ॅपची परिपूर्ण माहिती घ्या.

4. आपल्या मोबाईलला लॉक करुन ठेवा. लक्षात असू द्या, आपल्या स्मार्टफोन आणि लॅन्डलाईन फोनमध्ये खूप फरक आहे. आपला स्मार्टफोन सांभाळून ठेवा.

5. यूपीआय अॅप डाऊनलोड करताना तो नामांकित कंपनीचा असावा, यासाठी त्याची माहिती आधी नीट वाचा.