भारतात येणार जगातील सर्वात स्वस्त Electric Scooter

7 ते 8 तास चार्ज केल्यावर गाडी फुल चार्ज होते असा दावा कंपनीनं केला आहे.

Updated: Mar 10, 2021, 10:32 PM IST
भारतात येणार जगातील सर्वात स्वस्त Electric Scooter title=

मुंबई : स्वस्त उत्पादने बनवणारे डिटेल (Detel) कंपनी ही जगातील सर्वात स्वस्त ई-स्कूटर (e-Scooter) बाजारात आणणार आहे. हे स्वस्त स्कूटर संपूर्ण जगातील कोणत्याही देशात उपलब्ध नसल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनी आपला स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर डेटेल इझी प्लस (Detel Easy Plus) ला एप्रिल 2021 पर्यंत बाजारात आणण्याची तयारी करत आहे.

Detel Easy Plus चे फीचर्स

डिटेल इझी प्लस इलेक्ट्रिक दुचाकी सिंगल चार्ज केले असता 60 किमी पर्यंत प्रवास करू शकेल आणि त्यात 20Ah बॅटरी आहे.
कंपनीचा असा दावा आहे की, डिटेल इझी प्लस सर्वात स्वस्त असेल आणि ती ज्या किंमतीत येईल तो भारतीय रस्त्यांची आणि Traffic ची परिस्थिती पाहता सर्वात किफायतशीर असेल.
डेटेल इझी प्लस पिवळ्या, लाल आणि निळ्या रांगामध्ये लॉन्च होईल.
अहवालानुसार दुचाकी इलेक्ट्रिक वाहनाचा टॉप स्पीड ताशी 25 किलोमीटर इतका आहे.
7 ते 8 तास चार्ज केल्यावर गाडी फुल चार्ज होते असा दावा कंपनीनं केला आहे.
फुल चार्ज केले असता 60 किमी पर्यंत ही गाडी प्रवास करू शकते.

कंपनीने गेल्यावर्षी इलेक्ट्रिक टू-व्हीलर Detel Easy ला आणलं होतं, ज्याची किंमत GST मिळवून 19 हजार 999 रुपये इतकी ठरवली गेली.

पर्यावरण वाचवण्याची मोहिम

डिटल फाऊंडेशनचे संस्थापक गीतिका भाटिया यांचे म्हणणे आहे की, Detel इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीबरोबरच पर्यावरण वाचवण्याची मोहिमही सुरू केली जाईल. या उपक्रमांतर्गत ग्राहकांना वैयक्तिक प्रमाणपत्रासह कौतुकाचे टोकन दिले जाईल.

विशेष गोष्ट अशी असेल की या प्रमाणपत्रात ग्राहकांच्या नावावर लावलेल्या झाडाचा जिओटॅग देखील असेल, ज्यामुळे झाडाची जागा प्रत्यक्षात शोधण्यास मदत होईल.

मार्केटमध्ये डीटलकडून यापूर्वी देखील स्वस्त उत्पादने

डिटेल कंपनीने गेल्या वर्षी 1 Guru नावाने एक फोन देखील बाजारात आणला होता, ज्याची किंमत फक्त 699 रुपये होती.
या फोनमध्ये 16 जीबी मेमरी आहे जी एक्सपेंडेबल आहे.
तसेच फ्लॅशलाइट, जीपीआरएस आणि बीटी डायलर सारखी स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत.
कंपनीने हा फोन नेव्ही ब्लू आणि ब्लॅक या दोन नवीन रंगांमध्ये उपलब्ध केला होते.
लवकरच कंपनी फक्त 3999 रुपयात एलईडी देखील बाजारात आणणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

स्वस्त Power Bank
Detel ने स्वस्त आणि जास्त पावर वाली Power Bank लॉन्‍च केली आहे. ही Power Bank 10000 mAh आणि 20000mAh कॅपॅसीटीची आहे.
ही जगातील सर्वात स्वस्त पॉवर बँक असल्याचा कंपनीचा दावा आहे. याची किंमत अनुक्रमे 349 रुपये आणि 699 रुपये आहे.