नवी दिल्ली : बिटकॉईन हे एक असं चलन आहे ज्याचा उपयोग कुणीही, कधीही करू शकतो. हे एक अभासी चलन असून त्याला बिटकॉईन हे नाव देण्यात आलं. याचा वापर तुम्ही व्हर्च्युअल ग्लोबल पेमेंट करण्यासाठी करु शकता.
व्हर्च्युअल करंसी बिटकॉईनमध्ये एका दिवसात उंच स्तरावर पोहोचली आहे. त्यामुळे एका बिटकॉईनची किंमत १०,००० डॉलरच्या पार पोहोचली आहे. म्हणजेच भारतीय चलनात याची किंमत ६,५०,००० रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात याच्या किंमतीमध्ये ९०० टक्क्यांनी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.
बिटकॉईन एक व्हर्च्युअल करंसी (क्रिप्टो करंसी) आहे. हे चलन ऑनलाईन एक्सचेंजच्या माध्यमातून कुणीही खरेदी करु शकतं. सध्याच्या काळात भारतामध्ये एका बिटकॉईनची किंमत जवळपास ६ लाख ६५ हजार रुपयांच्या घरात आहे.
२००८मध्ये पहिल्यांदा बिटकॉईनसंदर्भात एक लेख प्रकाशित झाला होता. मात्र, याची सुरुवात २००९ मध्ये सुरुवात झाली. सातोशी नाकामोटो या नावाने डिजिटल चलनाने याची सुरुवात झाली.