Boat Lunar Pro LTE Price in India: आता मोबाईलची हातात बाळगण्याची गरज पडणार नाही. सिमकार्ड असलेले पहिले LTE स्मार्टवॉच लाँच लाँच झाले आहे. स्मार्टवॉचच्या मार्केटमध्ये मोठा दबदबा असलेल्या Boat कंपनीने हे पहिले LTE स्मार्टवॉच मार्केटमध्ये आणले आहे. Boat Lunar Pro LTE असे या वॉचचे नाव आहे. Boat Lunar Pro LTE स्मार्टवॉचमध्ये स्मार्टफोनसारखे फिचर्स मिळतात.
Boat कंपनीने बेजट फ्रेंडली तसेच अनेक महागडे स्मार्टवॉच लाँच केले आहेत. Boat कंपनीच्या स्मार्टवॉचना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहेत. अशातच आता कपंनीने आता पहिले LTE स्मार्टवॉच लाँच केले आहे. या LTE स्मार्टवॉचमध्ये ई-सिम सुविधा मिळणार आहे. हे स्मार्टवॉच Jio eSIM सोबत मिळेल. eSIM या स्मार्टवॉमध्ये मेसेज पासून कॉलिंगपर्यंत स्मार्टफोनमध्ये असताता अशा प्रकारचे अेनक फिचर्स मिळतील. Boat Lunar Pro LTE या स्मार्टवॉचमुळे सोबत मोबाईल ठेवायची पण गरज नाही. हे स्मार्टवॉच मोबाईलप्रमाणे काम करेल असा दावा Boat कंपनीने केला आहे.
Boat Lunar Pro LTE स्मार्टवॉचमध्ये स्मार्टफोनसारखे अनेक दमदार फिचर्स आहेत. Jio eSIM च्या सपोर्टमुळे Boat Lunar Pro LTE स्मार्टवॉचच्या मदतीने मोबाईलशिवाय कॉलिंग आणि मेसेजिंग सारखे कनेक्टीव्हीटी फिचर्स वापरता येवू शकतात. Boat Lunar Pro LTE स्मार्टवॉचमध्ये 1.39-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Boat Lunar Pro LTE स्मार्टवॉचमध्ये अनेक फिटनेस ट्रॅकिंग मोड आणि हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स उपलब्ध असतील. हार्टबिट ट्रॅकिंग, BP, SpO2 आणि इतर वैशिष्ट्ये यामध्ये उपलब्ध असतील. वॉचमध्ये सेडेंटरी रिमाइंड फीचर osKrn देण्यात आलe आहे. हे घड्याळ वापरणारी व्यक्ती एका जागी जास्त वेळ बसल्यास हे घड्याळ उठून चालण्याची सूचना देईल. यात धावणे, सायकलिंग, हायकिंग आणि इतर अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहेत.
Boat कंपनीने अद्याप Lunar Pro LTE स्मार्टवॉचची किंमत जाहीर केलेली नाही. लवकरच हे स्मार्टवॉच ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बोट कंपनी या वॉचची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशीच ठेवू शकते. सध्या मार्केटमध्ये मोजकेच LTE स्मार्टवॉच विक्रीसाठी उपलब्ध आहेत. LTE स्मार्टवॉच खूपच महागडे आहेत. Amazfit, Apple आणि Samsung या कंपनन्यांच्या प्रीमियम स्मार्टवॉमध्ये LTE फिचर मिळते.