BSNLचा धमाकेदार प्लॅन! फक्त 68 रुपयांत 21 GB डेटा

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एकदम स्वस्त आणि भारी रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्याची किंमत अत्यंत कमी आहे

Updated: May 3, 2021, 03:41 PM IST
BSNLचा धमाकेदार प्लॅन! फक्त 68 रुपयांत 21 GB डेटा
representative image

नवी दिल्ली : BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एकदम स्वस्त आणि भारी रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्याची किंमत अत्यंत कमी आहे. 

68 रुपयांचा रिचार्ज
BSNLच्या या रिचार्जची किंमत फक्त 68 रुपये आहे. 68 रुपयांचा हा प्लॅन तुम्हाला दररोज फायदे देणार आहे. BSNLचा 68 रुपयांचा प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध होणार आहे. या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे. 14 दिवसांमध्ये एकून 21 जीबी डेटा ग्राहकांना वापरता येणार आहे. हा पॅक विद्यार्थी आणि फ्रीलान्सिंग वापरकर्त्यांसाठी सोयीचा ठरणार आहे.

BSNLइतक्या स्वस्त दरात कोणतही टेलिकॉम कंपनी प्लॅन देत नाही. या प्लॅनच्या जवळपास Viचा 148 रुपयांचा 1 जीबी प्रतिदिवसाचा प्लॅन आहे. ज्याची वैधता 18 दिवस आहे.

Jio प्लॅन
जिओचा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांची वैधतेसह आहे. यामध्ये 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. 

Airtel चा प्लॅन
एअरटेल कंपनीच्या 298 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 2 जीबी डेटा मिळतो. तर 249 मध्ये 1.5 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.