४४४ रुपयांत ९० दिवसांसाठी थ्रीजी डाटा ऑफर!

सार्वजनिक क्षेत्रातली दूरसंचार सेवा कंपनी बीएसएनएलनं प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी एक धम्माल ऑफर जाहीर केलीय. 

Updated: Jun 16, 2017, 08:38 AM IST
४४४ रुपयांत ९० दिवसांसाठी थ्रीजी डाटा ऑफर!

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातली दूरसंचार सेवा कंपनी बीएसएनएलनं प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी एक धम्माल ऑफर जाहीर केलीय. 

या ऑफरमध्ये ग्राहकांना ४४४ रुपयांत प्रत्येक दिवशी ४ जीबी मोबाईल डाटा मिळणार आहे. ही सुविधा थ्रीजी वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. ही अनलिमिटेड डाटा ऑफर ९० दिवसांसाठी वैध असेल. म्हणजे तब्बल तीन महिन्यांसाठी तुम्हाला केवळ ४४४ रुपये भरावे लागणार आहेत. 

या ऑफरमध्ये ग्राहकांना १ जीबी थ्रीजी डाटा १ रुपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात कमी किंमत म्हटलं तर वावगं ठरणार नाही.