'जीएसटी'पूर्वीच लागू होण्यापूर्वी 'बजाज बाईक'ची बंपर ऑफर

१ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे. त्याआधीच बजाज ऑटोनं ग्राहकांना बाईक्स खरेदीवर भरमसाठी सूट देणं सुरू केलंय. 

Updated: Jun 15, 2017, 11:02 AM IST
'जीएसटी'पूर्वीच लागू होण्यापूर्वी 'बजाज बाईक'ची बंपर ऑफर  title=

नवी दिल्ली : १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे. त्याआधीच बजाज ऑटोनं ग्राहकांना बाईक्स खरेदीवर भरमसाठी सूट देणं सुरू केलंय. 

कंपनीनं आपल्या बाईकवर ४५०० रुपयांपर्यंत सूट जाहीर केलीय. वेगवेगळ्या मॉडल्सनुसार वेगवेगळी सूट लागू होईल. ही सूट प्रत्येक राज्यातल्या किंमतीनुसार आणि करांनुच्या अनुसार ठरेल. 

एक जबाबदार कंपनी म्हणून आपल्या ग्राहकांसाठी कंपनीनं ही सूट लागू केल्याचं बजाज ऑटोच्या बाईक बिझनेस अध्यक्ष एरिक वॅस यांनी म्हटलंय. 
जीएसटी लागू झाल्यानंतर किंमतीत होणारा फायदा पहिल्यांदाच ग्राहकांना देणारी बजाज ही पहिलीच कंपनी असल्याचा दावाही वॅस यांनी केलाय. त्यामुल ग्राहकांना सूटसाठी १ जुलैपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

जीएसटी लागू झाल्यानंतर देशातील प्रत्येत राज्यांत वस्तूंच्या किंमतीत फरक पडणार आहे. बजाजची ही सूट १४ जून ते ३० जून २०१७ पर्यंत सुरू राहणार आहे.