मुंबई : बीएसएनएलने आपल्या ग्रांहकांसाठी लूट लो पोस्टपेड ऑफर पुन्हा एकदा लाँच केलीये. या ऑफरचा लाभ मार्चमध्ये घेता येणार आहे.
बीएसएनलच्या नव्या ऑफरअंतर्गत प्रीमियम पोस्टपेड प्लान्सवर ६० टक्के डिस्काऊंट दिला जाणार आहे तसेच एक सिम कार्डही फ्रीमध्ये मिळणार आहे. इतकंच नव्हे तर १०० टक्के अॅक्टिव्हेनश चार्ज मिळणार आहे.
ही ऑफर बीएसएनएलच्या नव्या आणि जुन्या पोस्टपेड ग्राहकांना मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत नवे कनेक्शन घेणाऱ्यांना कोणतेही सिम एक्टिवेशन चार्ज लागणार नाही.
१,५२५ रुपयांचा प्रीमियम पोस्टपेड प्लान असेल तर यात ६० टक्के रेंटल डिस्काऊंट मिळू शकतो. या प्लानमध्ये अनलिमिडेट व्हॉईस कॉल, एसएमएस आणि डेटा दिला जातोय. दरम्यान, यासाठी १२,६ अथवा ३ महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान निवडावा लागेल. तेव्हा तुम्हाला ६० टक्क्यांपर्यंत रेंटल डिस्काऊंट मिळेल. जर तुम्ही सहा महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान घेतला तर तुम्हाला ४५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. जर तुम्ही ३ महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान घेतला तर ३० टक्के डिस्काऊंट मिळेल.
कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अशाच प्रकारचा पोस्टपेड प्लान आणला होता. त्यानंतर मार्चमध्ये पुन्हा रिलाँच केला.