मुंबई : तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे? पण पैशांची व्यवस्था होत नाहीये? मग काळजी करु नका. कारण, यंदाच्या दिवाळीत तुम्ही पैसे नसतानाही स्मार्टफोन खरेदी करु शकणार आहात. पाहूयात काय आहे हा प्रकार...
स्मार्टफोन निर्माता कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बाजारात विविध ऑफर्स घेऊन येत आहे. यामध्ये ईएमआय पासून कॅशबॅकपर्यंत विविध ऑफर्स असतात. मात्र, Mi कंपनीने एक आगळी-वेगळी आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा कुठलंही डाऊन पेंमेंट केल्याशिवाय स्मार्टफोन खरेदी करु शकाल.
Mi ची ही ऑफर १४ ते १७ ऑक्टोबर दरम्यान सुरु राहणार आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही पैसे न भरताही स्मार्टफोन खरेदी करु शकाल. या ऑफरला कार्डलेस EMI असं नाव दिलं आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.
शाओमीने या स्कीमला एका ईएमाय स्कीम प्रमाणे सुरु केलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला फोन खरेदी करण्यासाठी केवळ आधार कार्डची आवश्यकता लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला फोनचे पैसे EMI च्या माध्यमातून द्यावे लागणार आहेत. यासाठी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं क्रेडिट कार्डची आवश्यकता नाहीये.
शाओमीने आपल्या फेसबुक पेजवर या ऑफरची माहिती देताना म्हटलं आहे की, भारतात जवळपास ५ टक्के नागरिकांकडेच क्रेडिट कार्ड आहे तर इतर ९५ टक्के नागरिकांकडे क्रेडिट कार्ड नाहीये. त्यामुळे आता प्रत्येकजण केवळ आधार कार्ड आणि पॅन कार्डची डिटेल्स देऊन शाओमीचा कुठलाही फोन खरेदी करु शकतात. शाओमीने हे युनीक फिचर सुरु करण्यासाठी जस्टमनीसोबत हातमिळवणी केली आहे.
तुम्ही पैसे न देताही Mi चं कुठलंही प्रोडक्ट खरेदी करु शकता. तुम्हाला एका सोपी प्रक्रिया करावी लागणार आहे. सर्वातआधी तुम्हाला MI च्या वेबसाईटवर जावं लागणार आङे त्या टिकाणी अप्लाय नाऊ असा पर्याय दिसेल, हा पर्याय सिलेक्ट केल्यावर तुम्हाला तुमचा पॅनकार्ड आणि आधार कार्डची माहिती द्यावी लागणार आहे.
अकाऊंट अॅक्टिव्ह करुन नेटबँकीगच्या माध्यमातून तुमच्या उत्पनाची माहिती द्यावी लागणार आहे. उत्पानाची माहिती तपासल्यानंतर संपूर्ण प्रोसेस नेटबँकींगच्या माध्यमातून पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला क्रेडिट पर्यायात जाऊन क्रेडिट घेण्याचा पर्याय निवडावा लागणार आहे. हे अकाऊंट अॅक्टीव्ह झाल्यानंतर तुम्ही Mi च्या वेबसाईटवरुन फोन खरेदी करु शकता आणि त्याचे पैसे EMI ने पेड करु शकता.