नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोन बाजारात अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. पण नेमका कुठला फोन घ्यावा हे अनेकांना कळत नाही. तुम्हाला कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करायचा आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
टॉपवाइज कम्युनिकेशनची कंपनी कॉमियो इंडियाने सोमवारी आपले तीन स्मार्टफोन्स लॉन्च केले. हे सर्व फोन्स बजेट सेकमेंटचे आहेत.
कॉमियो इंडियाने COMIO C1, C2 आणि S1 हे तीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. खास बाब म्हणजे हे फोन तुमच्या बजेटमधील आहेत.
कॉमियो इंडियाने लॉन्च केलेल्या COMIO C1 फोनची किंमत 5,999 रुपये, COMIO C2 या फोनची किंमत 7,199 रुपये आणि COMIO S1 या फोनची किंमत 8,999 रुपये आहे.
कॉमियो इंडियाने इंटरनेट डेटासाठी रिलायन्स जिओसोबत हातमिळवणी केली आहे. त्यानुसार, हे तीन स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ऑफर्स आणि इंटरनेट डेटाचा लाभ घेता येणार आहे. या फोन्सची निर्मिती भारतातच करण्यात आली आहे.
हे स्मार्टफोन्स क्वॉड कोअर 64 बिट मीडियाटेक चिपसेटवर ऑपरेट होतात. यामध्ये 32GB इंटरनल मेमरी देण्यात आली असून सर्व फोन्स 4G सपोर्ट करतात.
COMIO C1 मध्ये 5 इंचाचा एचडी डिस्प्ले आणि 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
COMIO C2 या फोनमध्ये पावरफुल बॅटरी देण्यात आली असून 12.7 सेमीचा एचडी आयपीएस डिस्प्ले, 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 7.0 नॉगट ऑपरेटींग सिस्टमवर ऑपरेट होतो.
COMIO S1 या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 5.2 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंट फिंगरप्रिंट सेंसर, 2GB रॅम आणि 2,700 एमएच बॅटरी देण्यात आली आहे.