मुंबई : लोकांना फसवून पैसे कमवण्यासाठी भामट्यांनी एक शक्कल शोधून काढलीय. ऑनलाईन विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर भामटे पुरुषांना टार्गेट करतायत. पुरुषांसोबत फेसबुकवर फ्रेण्डशिप करुन त्यांचा मोबाइल नंबरवर घेतात. त्यावर अश्लील व्हिडिओ कॉल करत स्क्रीन रेकॉर्ड करतात. याची व्हिडिओ क्लिप तयार करून ब्लॅकमेलिंग करतात.
सायबर भामटे पुरुषांना फसवण्यासाठी, सोशल मीडिया माध्यमावर महिलांच्या फोटोचा गैरवापर करत महिलेची वाटेल अशी प्रोफाइल तयार करतायतय. पुरुषांना जाळयात अडकवण्यासाठी सोशल मीडियावर व्हाट्सऍप नंबर स्वतःहून देतात. आवाज बदलणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर करून पुरुषांशी महिलेच्या आवाजात गप्पा मारून विश्वास संपादन करतात. आणि मग सायबर भामट्यांचा खेळ सुरु होतो.
पोर्नोग्राफ़िकल क्लिप खरी आहे असे भासवत स्क्रीन रेकॉर्डिंगच्या साह्याने त्या व्यक्तीची क्लिप रेकॉर्ड करून वायरल करायची धमकी देत पैसे उकळतात !
सायबर तज्ञ तन्मय दिक्षित यांनी यापासून कसे वाचायचे यासाठी काही टीप्स दिल्या आहेत. आवश्यक असलेल्या महत्वाच्या व्यक्तींनाच आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलला ऍड करावे. तसेच सोशल मीडिया अकाऊंटची गोपनीयता सेटिंग प्रणाली ही उत्तम ठेवावी असे दिक्षित सांगतात. महत्वाच्याच कामासाठीच व्हिडिओ कॉलचा वापर करावा. असं काही घडत असल्यास, त्याचे पुरावे जमा करून ठेवा. ज्यामुळे सायबर भामट्यांना पकडण्यास मदत होईल असे आवाहन देखील दिक्षित यांनी केले आहे.