100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज कूपन, कोणत्या कंपनीचा बेस्ट प्लान ?

100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लान्स

Updated: Apr 8, 2021, 12:22 PM IST
100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज कूपन, कोणत्या कंपनीचा बेस्ट प्लान ?

मुंबई : दूरसंचार कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा जास्त रिचार्ज कूपन देत आहेत. Airtel, Jio आणि Vi ग्राहकांसाठी नव्या ऑफर आणतंय. यामध्ये 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रीचार्ज प्लानची सगळीकडे चर्चा आहे. या प्लानची किंमत कमी असून ग्राहकांना त्यामध्ये बर्‍याच छान ऑफर मिळत आहेत. आज आम्ही तुम्हाला कंपन्यांच्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लान्सची माहिती देणार आहोत.

Airtel चा प्लान 

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेल आपल्या ग्राहकांना दोन उत्कृष्ट रिचार्ज प्लान ऑफर करतेय. हे प्लान 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे आहेत. पहिल्या रिचार्ज प्लानची किंमत 79 रुपये असून याची वैधता 28 दिवसांची आहे. यात ग्राहकांना 200 एमबी डेटा मिळतो. दुसर्‍या योजनेची किंमत 49 रुपये असून वैधता 28 दिवसांची आहे.पण या प्लानमध्ये ग्राहकांना केवळ 100MB डेटा दिला जातो.

रिलायन्स जिओचा प्लान

रिलायन्स जिओ 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत काही रिचार्ज प्लान ऑफर करतेय. 51 रुपयांचा पहिला प्लान आहे. यात ग्राहकांना 6GB चा जबरदस्त डेटा दिला जातोय. या व्यतिरिक्त कंपनी 21 रुपयांचा प्लान देखील ऑफर करतेय. या स्वस्त योजनेत युजर्सना 2 जीबी डेटा मिळतो. या दोन्ही योजना टॉप-अप आहेत. म्हणजेच, जिओ ग्राहकांद्वारे आधीपासून चालू असलेल्या कोणत्याही योजनेसह अतिरिक्त डेटा यात उपलब्ध असेल.

Vi चा प्लान

Vi (Vodafone- Idea) देखील आपल्या ग्राहकांना स्वस्त प्लान देतेय. कंपनीचा 48 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात युजर्सना 3 जीबी डेटा मिळतो. तसेच 200MB डेटा देखील उपलब्ध आहे. या योजनेची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. याशिवाय Viचा 98 रुपयांच्या रिचार्जची प्लानही आहे. त्यात एकूण 12 जीबी डेटा देण्यात आला आहे.