तुमच्या बाईक, कारवरील 'हा' 17 आकडी नंबर करु शकतो घात; वेळीच सावध व्हा नाहीतर...

What is a VIN: आपल्यापैकी अनेकांना या क्रमांकाची माहिती नसते. मात्र या क्रमांकाचा वापर करुन तुमचं वाहन चोरीला जाऊ शकतं. अगदी कारच नाही तर बाईक, बस आणि ट्रकलाही हे लागू होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 25, 2023, 01:52 PM IST
तुमच्या बाईक, कारवरील 'हा' 17 आकडी नंबर करु शकतो घात; वेळीच सावध व्हा नाहीतर... title=
हा क्रमांक सर्वच वाहनांवर असतो (फोटो युट्यूबवरुन साभार)

What is a VIN: वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या प्रत्येक कारला एक विशेष क्रमांक दिला जातो. या क्रमांकाला VIN असं म्हणतात. VIN चा फूलफॉर्म व्हेइकल आयडेंटीफिकेशन नंबर असा होता. म्हणजेच कार ओळखण्यासाठी तिला दिलेला विशेष क्रमांका. VIN हा सामान्यपणे 17 आकड्यांचा क्रमांक असतो. अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर हा कारचा आधार क्रमांक असतो. वाहनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी अशाप्रकारे प्रत्येक युनिटला म्हणजेच कारला वेगला VIN क्रमांक देणे बंधनकारक असते. हा नियम कारबरोबरच बाईक, बस, ट्रक अगदी सगळ्याच वाहनांना लागू असतो. VIN क्रमांकाशिवाय वाहनविक्री केली जात नाही. मात्र सोयीसाठी देण्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते तसाच प्रकार VIN क्रमांकाला लागू होतो. 

होऊ शकते चोरी

VIN क्रमांकाचा वापर करुन हल्ली वाहनांची चोरी केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. आतापर्यंत अनेकदा अशा चोरीच्या घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये चोरांनी VIN क्रमांकाचा वापर करुन गाडी लंपास केली आहे. आपल्यापैकी अनेकांना या VIN क्रमांकाचं महत्त्व ठाऊक नसलं तरी चोरांना ते चांगलेच ठाऊक आहे. आता तुमच्या कारचा किंवा कोणत्याही वाहनाचा हा VIN क्रमांक चोरांच्या हाती लागू नये म्हणून काय करता येईल हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कोणती माहिती असते या क्रमांकाला जोडलेली

VIN क्रमांकाच्या माध्यमातून वाहन मालकाची खासगी माहिती चोरांच्या हाती जाण्याची शक्यता वाढते. कारच्या खिडकीवर असलेले स्टीकर्स किंवा समोर डॅशबोर्डवरील स्टीकर्सवर ही माहिती असेल तर अधिक सतर्क होण्याची गरज आहे. चोर या VIN क्रमांकाच्या मदतीने वाहन मालकाची खासगी माहिती चोरतात. चोरांच्या हाती एखाद्या वाहनाचा VIN क्रमांक लागला तर त्यावरुन कारच्या रजिस्ट्रेशनची सर्व माहिती, मालकाचा पत्ता, फोन नंबर, वय आणि नावाची माहिती मिळते. 

चावीही करु शकतात क्लोन

कारच्या VIN क्रमांकाप्रमाणेच प्रत्येक कारची चावी ही वेगळी असते. मात्र VIN क्रमांकाच्या मदतीने चोर तुमच्या कारची चावीही क्लोन करु शकतात. म्हणजेच अशी चावी तयार करुन घेतली तर तुमच्याकडी खरी चावी तुमच्याकडेच असली तरी कार चोरीला जाऊ शकते. सध्या ब्लॅक मार्केटमध्ये अशा अनेक क्लोनिंग पद्धती उपलब्ध आहे ज्याच्या मदतीने आरोपी कारची क्लोन चावी तयार करु शकतात. या VIN क्रमांकाचा वापर चोर गाडीची खरी ओळख लपवण्यासाठीही करतात. चोरी केलेल्या गाड्यांचे VIN क्रमांक एकमेकांशी बदलून दिशाभूल करुन या कार सेकेण्ड हॅण्ड कार म्हणून विकल्याही जातात. त्यामुळे अधिक सावध राहणं गरजेचं आहे.

सुरक्षेसाठी काय खबरदारी घ्यावी?

VIN क्रमांक हा 17 आकड्यांचा कोड असतो. या क्रमांकामध्ये कार कधी तयार करण्यात आली त्याची तारीख, इंजिनची क्षणता आणि कोणत्या पद्धतीच्या इंधनावर कार चालते याची माहिती असते. तसेच संबंधित वाहन कोणत्या कारखान्यामध्ये तयार झालं आहे याची माहितीही या VIN क्रमांकावरुन मिळते. अनेक गाड्यांमध्ये VIN क्रमांक हा चेसिवर, बूटस्पेसजवळ किंवा कारच्या आतमध्ये सीटच्या खालील भागात छापलेला असतो. तसेच गाडीच्या भागांवर, विमा पॉलिसीवर आणि डीलरशीपकडेही हा VIN क्रमांक असतो. कारच्या विंडस्क्रीनवर किंवा बाहेरील बाजूस खिडकीवर वगैरे VIN क्रमांक असेल तर तुमची माहिती चोरांकडे पोहचू शकते. अनेकदा नव्या कारवरील स्टीकरवर हा VIN क्रमांक असतो. त्यामुळे तुम्हाला VIN क्रमांकाशी संबंधित माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर या स्टीकरवरील VIN क्रमांक खोडून टाकावा. तसेच कार पार्क करताना ती सीसीटीव्हीच्या कक्षेत असलेल्या ठिकाणी पार्क केली जाईल याची काळजी घ्यावी.