LOL, ILY, ROFL या शब्दांचा अर्थ काय? सोशल मीडियावर वापरले जाणारे short forms लगेच जाणून घ्या.

तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही शॉर्टकट सांगणार आहोत.

Updated: Aug 13, 2021, 03:18 PM IST
LOL, ILY, ROFL या शब्दांचा अर्थ काय? सोशल मीडियावर वापरले जाणारे short forms  लगेच जाणून घ्या. title=

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येक जण सोशल मीडिया वापरतो. त्यावरुन आपण आपल्या ओळखीच्या तर कधी अनोळखी लोकांना मेसेज करतो. परंतु तुम्ही मेसेज करताना नेहमी पाहिलं असणार की, बरेच लोकं मेसेज करताना काही शॉर्टकट पाठवतात जे आपल्याला माहित देखील नसतात, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही शॉर्टकट सांगणार आहोत. जे पुढच्या वेळेपासून तुम्ही देखील तुमच्या मित्रांसोबत चॅट करताना वापरु शकता.

तुम्ही बऱ्याचदा लोकांना LOL लिहिताना पाहिले असेल, तर याचा फुल फॉर्म आहे Laugh out loud म्हणजेच मोठ्याने हसणे.

तर ILY चा अर्थ आहे I Love You म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते.

ROFL चा अर्थ आहे, Rolling on the floor laughing म्हणजेच जमिनीवर लोळून लोळून हसु येणे.

तर LOLZ चा अर्थ आहे, more than one laugh म्हणजे खूप जोरात हसणे.

 BFF चा अर्थ आहे, Best friends forever म्हणजे खूप चांगले मित्र.

IDK चा अर्थ आहे, I Don't Know म्हणजेच मला माहित नाही.