भारतात सगळ्यात जास्त विकला जाणारी बाईक कोणती? तुम्हाला माहित आहे?

 सध्याच्या तरुण मुलांचा कल नवीन बाईक्सकडे जास्त आहे. या तरुण मुलांच लक्ष बाजारात येणाऱ्या प्रत्येक बाईककडे असं.

Updated: Aug 30, 2021, 05:43 PM IST
भारतात सगळ्यात जास्त विकला जाणारी बाईक कोणती? तुम्हाला माहित आहे? title=

मुंबई : सध्याच्या तरुण मुलांचा कल नवीन बाईक्सकडे जास्त आहे. या तरुण मुलांच लक्ष बाजारात येणाऱ्या प्रत्येक बाईककडे असं. ती बाईक कशी आहे? ती कशी दिसते? त्याचे काय फीचर आहेत? या सगळ्याकडे लक्ष असतं. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? सध्या भारतात कोणत्या बाईकला डिमांड आहे?

सध्या भारतात सगळ्यात जास्त विकली जातेय ती, रॉयल एनफील्ड बाईक. जुलै 2021 मध्ये रॉयल एनफील्डच्या एकूण 47 हजार 934 मोटारसायकली भारतीय बाजारात विकल्या गेल्या. तर, जुलै 2020 मध्ये रॉयल एनफील्डच्या एकूण 30 हजार 281 बाईक्स भारतीय बाजारात विकल्या गेल्या.

नंबर  बाईक्स  जुलै 2021 मधील विक्री जुलै 2020मधील विक्री किती अंतर
1 Royal Enfield Classic 350 25,534 यूनिट्स 17,890 यूनिट्स 42.73 टक्के विक्री वाढली
2 Royal Enfield Classic 350 8,777 यूनिट्स -- --
3 Royal Enfield Classic 350 7,133 यूनिट्स 7,112 यूनिट्स 0.30टक्के विक्री वाढली
4 Royal Enfield Classic 350 2,949 यूनिट्स 3,742 यूनिट्स 21.19 टक्के विक्रीत घट
5 Royal Enfield Himalayan 2,730 यूनिट्स 479 यूनिट्स 470 टक्के विक्री वाढली
6 Royal Enfield 650 Twins 811 यूनिट्स 1,058 यूनिट्स 23.35 टक्के विक्रीत घट

तुम्ही जर आकडेवारी पाहिली तर तुम्हाला कळेल की, जुलै 2020 च्या तुलनेत जुलै 2021 मध्ये रॉयल एनफील्डची विक्री 58.30 टक्क्यांनी वाढली. या काळात रॉयल एनफील्ड क्लासिक 350 कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक ठरली.

जुलै 2021 मध्ये रॉयल एनफील्डच्या एकूण 47 हजार 934 मोटारसायकली भारतीय बाजारात विकल्या गेल्या. त्यातील जून 2021 मध्ये रॉयल एनफील्डच्या एकूण 35 हजार 815 युनिट्स भारतीय बाजारात विकल्या गेल्या. तर जून 2021 च्या तुलनेत जुलै 2021 मध्ये बाईक्सच्या विक्रीत 33.84 टक्क्यांनी वाढली आहे.