व्हॉटसअप स्टीकर्सच्या नादात व्हायरस डाऊनलोड करू नका

व्हॉट्सअॅपवर स्टिकर वापरणारे आणि स्टिकर वापरता न येणारे असे दोन गट

Updated: Nov 7, 2018, 05:30 PM IST
व्हॉटसअप स्टीकर्सच्या नादात व्हायरस डाऊनलोड करू नका

मुंबई : यंदाच्या दिवाळीत सोशल मीडियावर चर्चा आहे ती व्हॉट्सअॅपनं सुरू केलेल्या खास फिचर्सची... दिवाळी शुभेच्छा देणाऱ्या स्टिकर्सची... या स्टिकर्सनी अवघ्या तरूणाईला मोहिनी घातलीय. व्हॉट्सअॅपवर शुभेच्छा दिल्याशिवाय सध्या कोणताही सण साजरा होत नाही... त्यात दिवाळी हा तर खास सण... त्यामुळंच ऐन दिवाळीच्या तोंडावर व्हॉट्सअॅपनं आपल्या ग्राहकांसाठी एक नवी सेवा सुरू केलीय... ती म्हणजे व्हॉट्सअॅप स्टिकर्स... दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या स्टिकर्सनी व्हॉट्सअॅप भरून गेलंय... बघता बघता तरूणाईवर या स्टिकर्सनी असं काही गारुड केलंय की, विचारू नका... इमोजी आणि जिफपेक्षाही व्हॉट्सअॅप स्टिकरवर सध्या सगळ्यांच्याच उड्या पडतायत. पण, थांबा हे स्टीकर्स डाऊनलोड करायच्या नादात मोबाईलमध्ये व्हायरस डाऊनलोड करू नका...

खमंग सोशल चर्चा

सोशल मीडियावर अजूनही अनेक जण असे आहेत, ज्यांना हे स्टिकर्स आपल्या व्हॉट्सअॅपवर पाहता येत नाहीयत... त्यामुळंच की काय, सोशल मीडियात व्हॉट्सअॅपवर स्टिकर वापरणारे आणि स्टिकर वापरता न येणारे असे दोन गट पडल्याची खमंग चर्चा रंगलीय...

अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्रणालींवर चालणाऱ्या सर्व मोबाईल फोन्समध्ये व्हॉट्सअॅपची स्टिकर सुविधा उपलब्ध आहे. फक्त त्यासाठी व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करून घेण्याची गरज आहे. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टिकर केवळ पाहता येणार नाहीत... तर ते आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करता येतील. इतरांना फॉरवर्ड देखील करता येईल... आणि सेव्ह केलेले स्टिकर डिलीट देखील करता येईल... रेडीमेड स्टिकर उपलब्ध करून देणारी शेकडो अॅप्लिकेशन सध्या गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर आहेत. ही अॅप्लिकेशन डाऊनलोड करून ते स्टिकर तुम्हाला एकमेकांना फॉरवर्ड करता येतील.

अधिक वाचा :- चिंता मिटली! असे मिळवा व्हॉट्सअॅप स्टिकर्स

व्हायरसची शक्यता

व्हॉट्सअॅपवर स्टिकर सेवा सुरू करायची असेल तर विशिष्ट लिंक २० जणांना पाठवा, अशा आशयाचे बोगस मेसेज देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत. मात्र त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका... कारण असा मेसेज हा एखादा व्हायरस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

एवढेच नव्हे तर स्वतःचा फोटो असलेले स्टिकर्सही तुम्हाला तयार करता येतील किंवा तुम्हाला एखादा पर्सनलाइज संदेश आणि फोटोही स्टिकर म्हणून बनवता येईल. 

अॅन्ड्रॉईड युझर्ससाठी...

अँड्रॉईड फोन वापरणारी मंडळी PERSONAL STICKER FOR WHATSAPP आणि BACKGROUND ERASER अशी स्वतंत्र अॅप्लिकेशन्स वापरून पर्सनलाइज स्टिकर तयार करू शकतात... त्याबाबतच्या स्वतंत्र लिंक्स युट्युबवर उपलब्ध आहेत.