चिंता मिटली! असे मिळवा व्हॉट्सअॅप स्टिकर्स

जगात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप असलेलं व्हॉट्सअॅप नेहमीच नवीन अपडेट घेऊन येतं.

Updated: Nov 6, 2018, 07:51 PM IST
चिंता मिटली! असे मिळवा व्हॉट्सअॅप स्टिकर्स

मुंबई : जगात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप असलेलं व्हॉट्सअॅप नेहमीच नवीन अपडेट घेऊन येतं. यावेळी व्हॉट्सअॅपनं अपडेटमध्ये स्टिकर्स आणले आहेत. पण अनेक मोबाईलमध्ये हे स्टिकर्स अजूनही आलेले नाहीत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होतोय. पण आज आम्ही तुमची ही अडचण दूर करणार आहोत. तुमच्याही व्हॉट्सअॅपमध्ये स्टिकर्स मिळवण्यासाठी तुम्हाला एक सोपी गोष्ट करावी लागणार आहे.

सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सिक्युरिटी सेटिंग्जमध्ये जाऊन अननोन सोर्स ऑफ असेल तर तो ऑन करावा लागेल.

यानंतर गुगल क्रोमवर जाऊन व्हॉट्सअॅप फॉर अॅन्ड्रॉईड (Whats app for android) टाईप करा. यानंतर क्रोममध्ये आलेल्या पहिल्याच लिंकवर क्लिक करा.

या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड नाऊ हा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुमचं व्हॉट्सअॅपचं अपडेटेड व्हर्जन डाऊनलोड व्हायला सुरुवात होईल.

हे व्हर्जन डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप अपडेट करायचंय का असा प्रश्न विचारण्यात येईल. तेव्हा तुम्हाला इन्स्टॉल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. व्हॉट्सअॅपचं हे व्हर्जन इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल फोन रिस्टार्ट करा.

फोन रिस्टार्ट केल्यानंतर स्माईली आणि जीआयएफच्या बाजूला स्टिकर्सचा नवा ऑप्शन तुम्हाला दिसायला लागेल. यातले काही स्टिकर्स व्हॉट्सअॅपनं इनबिल्डच दिले आहेत. 

तुम्हाला आणखी स्टिकर्स हवे असतील तर तिकडेच इन्स्टॉलचा एक बाण दाखवण्यात आला आहे. 

या स्टिकर्सपेक्षाही तुम्हाला आणखी स्टिकर्स हवे असतील तर स्टिकर्सच्या खालतीच गेट मोर स्टिकर्सचा ऑप्शन देण्यात आलाय. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही प्ले स्टोरवर जाता आणि तिकडे तुम्हाला स्टिकर्सचे असंख्य ऑप्शन्स देण्यात आलेत. यातले तुमचे आवडते स्टिकर्स तुम्ही डाऊनलोड करू शकता.